Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुग्‍णांमधील लक्षणे समजून योग्‍य उपचार करा

जुनागडे हेल्‍थ फाउंडेशनच्‍या लोटस मास्‍टर क्लास कार्यशाळेत मार्गदर्शन

नाशिक-  प्राथमिक स्‍तरावर तपासणीसाठी आलेल्‍या रुग्‍णामधील लक्षणे त्‍याच्‍या आराजाचे गांभीर्य सांगत असतात. या लक्षणांचे अचूक विश्‍लेषण करतांना उपच

मुख्यमंत्री शिंदेंनी इर्शाळवाडीत ठोकला दिवसभर तळ
सोनिया दुहान अजित गटाच्या वाटेवर
राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे

नाशिक-  प्राथमिक स्‍तरावर तपासणीसाठी आलेल्‍या रुग्‍णामधील लक्षणे त्‍याच्‍या आराजाचे गांभीर्य सांगत असतात. या लक्षणांचे अचूक विश्‍लेषण करतांना उपचार करावा. किंवा तज्‍ज्ञांना वेळीच दाखविण्याचा सल्‍ला रुग्‍णांना देत आजाराची गुंतागुंत टाळावी, असे आवाहन विविध क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी निवासी वैद्यकीय अधिकार्यांना केले. जुनागडे हेल्‍थ फाउंडेशन, जनकल्‍याण रक्‍तपेढी आणि आयएमए नाशिक, लोटस हॉस्‍पिटल यांच्‍यातर्फे निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्‍यासाठी शालिमार येथील आयएमए सभागृह येथे ‘लोटस मास्‍टर क्‍लास २०२३’ या कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी सहभागी होतांना तज्‍ज्ञांनी मार्गदर्शन करत डॉक्‍टरांना विविध गुंतागुंतीत उपचाराची दिशा ठरविण्याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्‍या उद्‌घाटनाप्रसंगी जुनागडे हेल्‍थ फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.प्रितेश जुनागडे,  आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ.विशाल गुंजाळ, जनकल्‍याण रक्‍तपेढीचे अध्यक्ष राजेश रत्‍नपारखी, डॉ.श्‍यामा कुलकर्णी,  सचिव शैलेश पंडित,  आदी उपस्‍थित होते. एकूण सात सत्र पार पडले. सर्वात पहिल्‍या सत्रात रक्‍तविकार आणि कर्करोग तज्‍ज्ञ डॉ.प्रितेश जुनागडे यांनी डेंग्‍यूचा तपास आणि प्‍लेटलेट कमी राहाणे यासंदर्भात मार्गदर्शन केले. कुठल्‍याही व्‍यक्‍तीचे आरोग्‍य सुदृढ राहावे, यासाठी त्‍याच्‍या शरीरातील रक्‍ताचे प्रमाण व रक्‍तनिर्मिती प्रक्रिया महत्त्वाची ठरते. त्‍यामुळे वैद्यकीय अहवालातील संभाव्‍य धोक्‍यांकडे दुर्लक्ष करायला नको, असे त्‍यांनी नमूद केले.

दुसर्या सत्रात डॉ. यतिंद्र दुबे यांनी रुग्‍ण हालचाल मंदावलेली असतांना अशा परिस्‍थितीत घ्यावयाची खबरदारीविषयी मार्गदर्शन केले. कुठल्‍या वैद्यकीय स्‍थितीत काय भूमिका घ्यावी, यासंदर्भात त्‍यांनी माहिती दिली. तिसर्या सत्रात हृदयरोग तज्‍ज्ञ डॉ.राजेंद्र देशमुख यांनी ‘ईसीजी’मधील पाच बदल ज्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष करायला नको, यासंदर्भात मार्गदर्शन केले. तर पाचव्‍या सत्रात चेस्‍ट फिजिशियन डॉ.अनिरबन बंडोपाध्याय यांनी श्‍वसन मंदावल्‍यास  घ्यावसाच्‍या खबरदारीविषयीची माहिती दिली. तसेच मधुमेह तज्‍ज्ञ डॉ.प्रविण सुपे यांनी मधुमेहाचे उच्च प्रमाण राहाणार्या रुग्‍णांवर उपचार करतांना काय काळजी घेतली पाहिजे, याबद्दल माहिती दिली. अंतिम सत्रात मेंदूविकार तज्‍ज्ञ डॉ.राहुल बाविस्‍कर यांनी मज्‍जा संस्‍थेशी निगडीत व्‍याधींची माहिती सादरीकरणातून दिली.

‘नॅट’प्रमाणित रक्‍तातून संभाव्‍य संसर्ग टाळावा – कार्यशाळेत डॉ.मंदाकिनी सारमाह यांनी ‘नॅट’ची गरज याबाबत मार्गदर्शन केले. एचआयव्‍ही आणि यांसारखे संसर्गजन्‍य आजार रुग्‍णाला रक्‍तातून उद्‌भवू शकतात. वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. त्‍यामुळे ‘नॅट’ प्रमाणित रक्‍त दिल्‍यास हा संसर्गाचा धोका टाळता येऊ शकतो. सुरक्षिततेच्‍या दृष्टीने हे तंत्रज्ञान महत्त्वाचे असल्‍याचे यावेळी नमूद केले.

COMMENTS