लोणी : बदलत्या हवामानातील चढ-उतार यामुळे शेती व्यवसाय हा अडचणीत आला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करून अतिरिक्त उत्प
लोणी : बदलत्या हवामानातील चढ-उतार यामुळे शेती व्यवसाय हा अडचणीत आला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करून अतिरिक्त उत्पादन मिळावे. यासाठी शेळीपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांना फायदेशीर आहे पण तो व्यवसाय आपण नवे तंत्रज्ञान स्वीकारून करावा असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे पशुसंवर्धन विभागाचे डॉ. विठ्ठल विखे यांनी केले.
बाभळेश्वर येथे संस्थेचे अध्यक्ष आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माझी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शेळीपालन प्रशिक्षणामध्ये डॉ. विठ्ठल विखे बोलत होते. दोन दिवसीय शेळीपालन प्रशिक्षणादरम्यान उपस्थित प्रशिक्षणार्थींना बंदिस्त शेळीपालन, शेळ्यांसाठी सकस आहार व्यवस्थापन, व्यावसायिक दृष्ट्या शेळीपालन, सुधारित जाती याविषयी डॉ. विठ्ठल विखे यांनी केले.तर शेळ्यांचे विविध आजार, लसीकरण, विविध शासकीय योजना यांविषयी मार्गदर्शन पशुधन विकास अधिकारी डॉ.जगदीश खेडकर यांनी केले.खंडाळा येथील सुधारित शेळीपालन करणारे प्रगतशील शेतकरी चंद्रकांत मुंढे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना त्यांनी अवलंब केलेली पद्धत, चार व्यवस्थापन, लसीकरण आणि सुधारित जातींची निवड, त्यांनी केलेले व्यवस्थापन यावर उपस्थित प्रशिक्षणार्थीं सोबत चर्चेद्वारे मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे शंका समाधान करण्यात आले आणि त्यांना प्रमाणपत्र वितरण केले.सदर प्रशिक्षणासाठी परिसरातील एकूण ५० शेतकरी उपस्थित होते.
COMMENTS