Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन प्रेमीयुगलाची रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या

मुंबई : मुंबईतील विक्रोळीमध्ये एका अल्पवयीन प्रेमी युगलानी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. मुलीचे वय अवघे 15 वर्ष असून मुलाचे वय 19 वर्ष अ

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटाजवळील कंपनीला भीषण आग
’यास’चा उत्तरकेडील राज्यांना अतिदक्षतेचा इशारा ; मोदी आज पश्‍चिम बंगाल, ओडिशाचा दौरा करणार
मराठा आरक्षणसाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : मुंबईतील विक्रोळीमध्ये एका अल्पवयीन प्रेमी युगलानी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. मुलीचे वय अवघे 15 वर्ष असून मुलाचे वय 19 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नासाठी घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर धावत्या रेल्वे एक्सप्रेससमोर उडी घेत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ही पुढे आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 26 जानेवारीच्या दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. यातील पंधरा वर्षीय मुलगी ही परप्रांतीय असून मुलगा हा महाराष्ट्रातील रहिवाशी आहे. या दोघात जवळीक असून प्रेम प्रकरणाला प्रांतीय अथवा जातीय अँगल असून लग्नाला विरोध केल्याने ही घटना घडली का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. हे दोघेही भांडुपच्या हनुमान नगर परिसरातील रहिवासी आहे. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस ही मुलगी आपल्या आजीसोबत बाहेर गेली होती. मात्र मधातच ही मुलगी आजीपासून बाजूला झाली. त्यानंतर ती गायब असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांतर्फे शोधाशोध केली असता रेल्वे पोलिसांनी याबाबत माहिती दिल्याने हे प्रकरण उजेडात आले आहे. परिणामी या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

COMMENTS