Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’माझी वसुंधरा’अंतर्गत चालता चालता कचरा उचलण्याची मोहीम

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियान -3 मध्ये सहभाग नोंदविला आहे. त्या  अंतर्गत पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मंगळवारी

 नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकरी बांधवांना भरीव मदत देऊन उभारी द्या ः मा.आ.कोल्हे
एसटीच्या प्रवाशांना मिळणार साडेपाच महिन्यांनी दिलासा
गावठी पिस्टल व दोन जीवंत काडतुसा सह एकास अटक l पहा LokNews24

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियान -3 मध्ये सहभाग नोंदविला आहे. त्या  अंतर्गत पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मंगळवारी कर्जत नगरपंचायत हद्दीतील कुळधरण रोड येथील राऊत हॉस्पिटल ते अभय क्लॉथ व समर्थ विद्यालय परिसरामध्ये  सकाळी साडेसहा वाजता नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले, गटनेते उपगटनेते, विषय समिती सभापती तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका,  सामाजिक संघटनेचे सर्व शिलेदार, समर्थ विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत राऊत व स्टाफ, सकाळी व्यायामासाठी येणारे नागरिक, प्रभातनगर, गुंड वस्ती व शहाजीनगर येथील नागरिक व नगरपंचायत सर्व सफाई कर्मचारी कार्यालयीन कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी चालता चालता विविध ठिकाणावरील कचरा उचलून स्वच्छता केली. यावेळी नगरसेविका प्रतिभा भैलुमे, नगरसेवक नामदेव राऊत, रज्जाकभाई झारेकरी, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, सुनील शेलार, अभय बोरा यांच्यासह नगरपंचायतचे कर्मचारी संतोष समुद्र, महेश पाचोरे, विलास शिंदे, रविंद्र नेवसे, राकेश गदादे, गोकुळ पवार, सागर राऊत, बुवासाहेब कदम, सर्व महिला व पुरुष सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने होते.

COMMENTS