Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उमरावती सोसायटी बँक पातळीवर शंभर टक्के फेड

कोपरगाव तालुका ः तालुक्यातील देर्डे को-हाळे येथील उमरावती सहकारी सोसायटीच्या सर्व कर्जदार सभासदांनी बँक पातळीवर 30 जून अखेर घेतलेल्या सर्व कर्जाची फे

सोमवार 11 ऑक्टोबर रोजी संगमनेर बंद
Shevgoan :नदीवरील पाण्याचा अंदाज न आल्याने ट्रकसह चालक गेला वाहून l LokNews24
माजी सैनिकांचा सन्मान करून कारगिल विजय उत्साहात

कोपरगाव तालुका ः तालुक्यातील देर्डे को-हाळे येथील उमरावती सहकारी सोसायटीच्या सर्व कर्जदार सभासदांनी बँक पातळीवर 30 जून अखेर घेतलेल्या सर्व कर्जाची फेड करून वर्षानुवर्षेची परंपरा कायम राखली असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरूण येवले यांनी केले.
           ते म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण भागातील सभासद शेतक-यांच्या उन्नतीसाठी सहकारी सोसायट्यांना केंद्रीभूत मानून सातत्यांने मार्गदर्शन केले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सहकारी संस्था आणि त्यांना उदभवणार्‍या अडचर्णीच्या सोडवणुकीसाठी आजवर विशेष प्रयत्न केले आहे. सोसायटीचे अध्यक्ष देवराम गवळी व उपाध्यक्ष साहेबराव शिंदे यांनी कर्जदार सभासद शेतक-यांना घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी वेळोवेळी आवाहन केले.  याकामी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक कोपरगांव शाखेचे तालुकाविकास अधिकारी काटे व कर्ज विभागाचे औताडे व उमरावती सहकारी सोसायटीचे सचिव अशोक घेर त्याचप्रमाणे बँक पातळीवर शंभर टक्के कर्ज भरण्यासाठी सोसायटीचे सर्व सभासद तसेच ग्रामपंचायत विविध सहकारी संस्थाचे सर्व आजी माजी सदस्य आदिंचे विशेष सहकार्य लाभले.

COMMENTS