Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे 15 दिवसांत एनडीएमध्ये जाणार

मंत्री केसरकरानंतर आमदार रवी राणा यांचा दावा

अमरावती ः लोकसभा निवडणुकांच्या कलचाचण्या जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार 350 पेक्ष

‘जालियनवाला’ घडले तसे ‘जालनावाला’ घडले
उद्धव ठाकरेंची पुन्हा पक्षप्रमुखपदी होणार निवड
उद्धव ठाकरे मोदींशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात

अमरावती ः लोकसभा निवडणुकांच्या कलचाचण्या जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार 350 पेक्षा अधिक जागा मिळवून सत्तेत येईल असा दावा करण्यात आला होता, त्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली सुरू झाल्या असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे निरोप पाठवत असल्याचा गौप्यस्फोट शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. त्यानंतर सोमवारी आमदार रवी राणा यांनी देखील उद्धव ठाकरे एनडीएमध्ये काही दिवसांतच येतील असा दावा केला आहे.

माध्यमांशी बोलतांना रवी राणा म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील 15 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सहभागी होतील. या दाव्यामुळे लोकसभा निवडणूक निकालाच्या ऐन तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य केले. त्यामुळे ते पुढील 15 दिवसांतच मोदींसोबत परत येतील, त्यांच्या सरकारमध्ये सहभागी होतील, असे रवी राणा यांनी म्हटले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, येणारा काळ नरेंद्र मोदींचा आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे. त्यामुळे निश्‍चितच पुन्हा एकदा एनडीएसोबत येतील, असे ते म्हणाले. त्यामुळे केंद्रामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यास अनेक प्रादेशिक पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचे दिसून येत आहे.

…तर, इंडिया आघाडीला लागेल गळती – केंद्रात पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर येण्याची चिन्हे दिसून येत असल्यामुळे इंडिया आघाडीला गळती लागण्याची चिन्हे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपविरोधात लढणारे विरोधक निकालानंतर पुन्हा एकदा एनडीएमध्ये जाण्यास इच्छूक असल्याचे कलचाचण्यांतून दिसून येत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतून अनेक प्रादेशिक पक्ष फुटून पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा एकदा एनडीएकडे जाण्यास इच्छूक असल्याचे दिसून येण्याची शक्यता आहे.

COMMENTS