Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईचे तख्त पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी राखले

सहापैकी चार जागांवर ठाकरे तर प्रत्येकी एक जागा भाजप आणि काँगे्रसला

मुंबई ः मुंबईतील सहा जागांसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली होती. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो, शिवाजी पार्कवर सभा घेत भाजपने आघाडी घेण्

शंकरराव गडाख संकाटात साथ देणारा मित्र – उद्धव ठाकरे
त्या 70 हजार कोटींच्या घोटाळ्यांचे का बोलला नाही ?
गडकरींसारख्या निष्ठावंत नेत्याला डावलले

मुंबई ः मुंबईतील सहा जागांसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली होती. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो, शिवाजी पार्कवर सभा घेत भाजपने आघाडी घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुंबईचे तख्त पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी आपल्याकडेच राखल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील 6 जागांपैकी 4 जागांवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विजय मिळवला आहे, तर एक जागा काँगे्रस आणि एक जागा भाजपने राखली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबई उत्तर पश्‍चिममधून अमोल कीर्तीकर, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आणि मुंबई ईशान्येतून संजय दीना पाटील विजयी झाले आहेत. उद्धव ठाकरेंची चार जागांवर विजय संपादन केला असून, भाजपने मुंबई उत्तर या केवळ एका जागेवर विजय मिळवला आहे. या जागेवर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पीयुष गोयल विजयी झाले आहेत. तर एका जागेवर वर्षा गायकवाड विजयी झाले आहेत. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे दुपारी 2 वाजेपर्यंतचे कल हाती आले असून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी सध्या मोठी आघाडी घेत विजय मिळवला आहे. तर, शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा दारुण पराभव झाला आहे. ठाकरेंचा मुंबईतील हा पहिला विजय आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. महाराष्ट्रानं गेल्या दोन वर्षांच न भूतो न भविष्यती अनेक राजकीय भूकंपांचा सामना केला आहे. तसेच, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील फुटीनंतरची पहिली सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. त्यातल्या त्यात मुंबईतील मतदारसंघांवर सर्वांच्याच नजरा खिळलेल्या. मुंबईतील अनेक जागांवर शिवसैनिक एकमेकांविरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरलेले. त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे, दक्षिण मध्य मुंबईचा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून शिवसेनेकडून राहुल शेवाळे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनिल देसाई मैदाना उतरले होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडी टिकवून होते. मात्र, त्यानंतर अनिल देसाईंनी मोठी आघाडी घेत, राहुल शेवाळेंना पिछाडीवर टाकलं आणि मुंबईतील पहिला विजय ठाकरेंकडे खेचून आणला. पक्षफुटीनंतरची पहिली निवडणूक असल्यामुळे ठाकरे आणि शिंदे दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. अशातच मतदारराजाने ठाकरेंच्या बाजूने कौल देत अनिल देसांईंच्या गळ्यात विजयाची माळ घातली. दक्षिण मुंबईतील लोकसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेना उमेदवारांमध्ये लढत होत आहे. शिंदेंच्या शिवसेनेने आमदार यामिनी जाधव यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे तर उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या मतदारसंघात ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत. उत्तर पश्‍चिम मुंबईत लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर यांचा अमोल किर्तीकर यांची पराभव करत विजय संपादन केला आहे.

उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड विजयी – उत्तर मध्य मुंबईची लढत शेवटच्या टप्प्यापर्यंत अत्यंत चुरशीची ठरल्याचे दिसून आले. या लढतीत भाजपकडून अ‍ॅड. उज्जवल निकम विरूद्ध काँगे्रसच्या वर्षा गायकवाड अशी लढत होती. या निकालाच्या सुरूवातीपासून अ‍ॅड निकम आघाडीवर असल्यामुळे निकम विजयी होतात की काय, अशी शंका उपस्थित होत असतांना शेवटच्या टप्प्यात मात्र काँगे्रसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय संपादन केला.

कोकण पट्टयात मात्र अपयश – कोकण पट्ट्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे उमेदवार अपयशी ठरले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विनायक राऊत पराभूत झाले आहेत. याठिकाणी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजयी खेचून आणला आहे. ते पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणामध्ये होते. रायगडमध्ये एकमेव अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा पराभव केला. पालघरमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. ठाणेमध्ये सुद्धा शिंदे गटाने मोठा विजय मिळवला असून त्या ठिकाणी नरेश मस्के यांनी ठाकरेंच्या राजन विचार यांचा पराभव केला.

COMMENTS