Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात डाळिंब चोरी करणारे दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात डाळिंबाची चोरी करण्यात आल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. भीमराव

दरोडा टाकण्याच्या तयारीतील आरोपींना हत्यारासह पकडले
गोधेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी बाबासाहेब शेळके
राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट; सलग दुसर्‍या दिवशी 41 हजाराच्यावर कोरोना रुग्ण आढळले

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात डाळिंबाची चोरी करण्यात आल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. भीमराव अनाजी आळेकर वय 68 वर्षे धंदा शेती रा. आळेकरमळा, ता. श्रीगोंदा जि. अहदमनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयदिप सुनिल शिंदे व लखन राजू जगताप दोघेही राहणार बेलवंडी कोठार तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांच्या विरोधात गुरंनं 659/2024 भा.द.वि.क.2023 303/2 नुसार श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार भीमराव अनाजी आळेकर हे मुलगा विलास भिमराव आळेकर, सुन राणी व नातवंडासह एकत्र राहतात श्रीगोंदा शहर हद्दीत मांडवण रोड, आळेकर मळा येथे शेती गट नं.1016/1 मध्ये त्यांचे 1 हे. 59 आर क्षेत्र असून त्यापैकी 30आरमध्ये मी सन 2012 साली डाळींब पिकाची लागवड केलेली आहे. सदर शेती भीमराव अनाजी आळेकर व मुलगा विलास करतात. सध्या डाळिंबाचे झाडाला डाळींबफळे आलेली असुन ते विक्री योग्य  झालेली आहेत. त्यामुळे फिर्यादी व त्यांचा मुलगा विलास नेहमी डांळीबाचे शेतात चक्कर मारत असतात. 11 जुलै 2024 रोजी रात्री 10.00 वा. फिर्यादी व मुलगा विलास चक्कर मारली होती. 12 जुलै 2024 रोजी 07.00 वा.चे सुमारास ते पुन्हा डाळींबाचे शेतात चक्कर मारण्या करीता गेले असता शेतातील डाळीबाच्या झाडांची फळे तुटून खाली पडलेली दिसली. म्हणुन फिर्यादी व मुलाने त्यांच्या शेतात व शेतालगत असलेल्या वनविभागाचे शेतात पाहणी करत असतांना त्यांना शेता लगत असलेल्या वनविभागाच्या जमीनीतील रस्त्याने एक मोटार सायकलचा आवाज आला म्हणून ते रस्त्यावर गेले असता त्यांच्या समोर एक काळ्या रंगाची मोटार सायकलवर दोन मुले लाल रंगाच्या 2 गोण्यामध्ये काहीतरी घेवुन जात असतांना दिसले व वनविभागाचे जमीनीत त्यांच्या बांधा लगत लाल रंगाचे 3 गोण्यामध्ये डाळींब भरलेली दिसली. त्यावेळी त्यांना शंका आल्याने त्यांनी त्या मोटार सायकल चालकास आवाज दिला असता ते न थांबता जोरात निघुन गेले म्हणून फिर्यादी व त्यांचा मुलगा विलास यांनी त्यांचा मोटार सायकलवरून पाठलाग करुन त्यांना श्रीगोंदा येथील उपसरपंच चहाचे हॉटेल जवळ पकडून त्यांना विचारपुस केली असता त्यांची त्याचे नाव  जयदिप सुनिल शिदे व लखन राजू जगताप दोन्ही रा. बेलवंडी कोठार ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतले त्यांचे कडील मोटार सायकलवर लाल रंगाच्या 2 गोण्यामध्ये डाळींबाची फळे मिळून आली. दोघांनाही पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. शेतातून चोरीस गेलेले डाळिंब अंदाजे लाल रंगाची पाच गोण्यामध्ये  सुमारे 300 किलो वजनाचे डाळींब अंदाजे 45000 हजार रुपये किंमतीची आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सुधाकर फलके करत आहेत.

COMMENTS