Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मौजमजेसाठी दुचाकी वाहन चोरणार्‍याला अटक

भारती विद्यापीठ पोलिसांकडून 5 दुचाकी जप्त

पुणे - मौजमजेसाठी पुणे शहर परिसरातून दुचाकी वाहने चोरणार्‍या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुच

चांदवड ला पुन्हा रास्ता रोको , शेतकरी रस्त्यावर  
शिवसेना संपवण्याचा घटकपक्षांचा डाव – उदय सामंत
पुण्यात हॉटेलची तोडफोड करत लुटले

पुणे – मौजमजेसाठी पुणे शहर परिसरातून दुचाकी वाहने चोरणार्‍या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून भारती विद्यापीठ, हडपसर आणि शिक्रापुर पोलिस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. शेखर चंद्रकांत चव्हाण (34, रा. हरणी, ता. पुरंदर,पुणे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीेचे नाव आहे.
वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासह वाहनचोरीचे गुन्हे घडू नयेत, यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान लिपाणे वस्ती भागात एक संशयीत चोरीची बुलेट गाडी घेवून थांबल्याची माहिती अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे यांच्यासह पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याच्याकडील बुलेट ही चोरीची असल्याचे समजले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने शहरासह जिल्ह्याच्या ग्रामिण भागातून आणखी चार दुचाकी चोरल्याचे कबूल केले. यानूसार पोलिसांच्या पथकाने चव्हाण याच्याकडून 2 लाख रुपये किंमतीच्या एकूण पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. चव्हाण हा सराईत वाहनचोर आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता, अंमलदार सचिन गाडे, अभिजीत जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची पाटली चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबधित महिलेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 75 वर्षीय महिला ह्या सातारा रस्त्यावरील शंकर महाराज मठात दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर त्या निगडी बसने परत घरी दांडेकर पुल चौकात आल्या. त्याचवेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातील 80 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या काढून चोरून नेल्या. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक एस कामठे हे करत आहे.

COMMENTS