Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शंभर हुन अधिक महिलांच्या सहभागाने लोणंद येथे दुचाकी रॅली ; रॅलीतून दिला महिला सक्षमीकरणाचा संदेश

लोणंद : दुचाकी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिला (छाया : सुशिल गायकवाड) लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथे गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाचे स्

महिला शिक्षकांना त्रास देणार्‍या गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई करावी : नंदकुमार गोडसे
माजी सभापती आनंदराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर
इस्लामपूरातील प्रभाग 11 मध्ये काट्याच्या लढती…?

लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथे गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शनिवार, दि. 2 एप्रिल रोजी महिलांच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंभरहुन अधिक महिलांच्या सहभागाने ही बाईक रॅली होत असताना महिलांमध्ये एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला. महिलांनी सजवलेली बाईक, डोक्यावर बांधलेले फेटे, गाडीवर फडकणारे भगवे झेंडे, डोळ्यावर घातलेले गॉगल्स आणि पारंपारिक पध्दतीने परिधान केलेला पोशाख यामुळे ही शोभायात्रा अधिक उठावदार दिसत होती.
नगरपंचायत पटांगणातून ही शोभा यात्रा सुरू करण्यात आली. यावेळी ही शोभायात्रा शिस्तबध्द पध्दतीने सुरू असताना महिला सक्षमीकरण आणि बेटी बचाव, बेटी पढाओ यांसारखे अनेक संदेश देण्यात आले. या शोभा यात्रेची संकल्पना लोणंद येथील बाळ लोणंदकर यांनी मांडली असता या संकल्पनेला कृतीत उतरविण्याचे काम करण्यात आले. ही शोभायात्रा यशस्वी होण्यासाठी प्रज्ञा खरात, प्राजक्ता घोडके, स्त्री रोग तज्ञ डॉ. स्वाती शहा, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शिल्पा पवार, माजी नगरसेविका शैलजा खरात, डॉ. सरिता वर्धमाने, केतकी खरात, कांचन घोडके, प्राजित परदेशी, संतोष खरात, आशितोष घोडके, बाळ लोणंदकर यांच्यासह अनेकांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी अनेक महिलांनी मनोगत व्यक्त करत असताना या आयोजनाबद्दल आयोजकांचे विशेष आभार मानले असून दरवर्षी असे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी ही महिलांनी केली आहे. या रॅलीतून इनरव्हील क्लबच्या महिला पदाधिकारी व सदस्या यांचा ही विशेष सहभाग होता.
महिलांच्या बाबतीत सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा मुद्दा समोर येत असतो. तेव्हा अशा अनेक महिला असतील की त्या घरा बाहेर पडून स्वतःचा आनंद घेऊन हा क्षण त्यांनी अनुभवला असेल. या रॅलीतून अनेक महिलांना प्रेरणा मिळणार आहे. शिवाय आपण समाजात ताठ मानेने जगले पाहिजे ही जागृती या निमित्ताने होत आहे. महिलांवरील होणारे अन्याय-अत्याचार गंभीर असून महिलांना सक्षम करणारी चळवळ आक्रमकपणे कार्यरत असणे गरजेचे आहे. आज महिलांची दुचाकी रॅली ही शोभा यात्रा फक्त इव्हेंट पुरती मर्यादित न राहता. यातून अनेक वंचित शोषित पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेत महिला सक्षमीकरणाचा विषय सत्यात उतरण्यासाठी आवश्यक आहे. महिलांच्या दुचाकी रॅलीस दाद देण्यासाठी पुरुष मंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

COMMENTS