Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाडीला कट मारून तिघांकडून दोघांना मारहाण, एकास पकडले

अहमदनगर : मोटर सायकल वरून चाललेल्या दोघांना समोरून येणाऱ्या मोटरसायकल वरील तिघांनी कट मारला व शिवीगाळ करून थांबवून त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम

शहा वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राच्या लिंक लाईनचे काम पूर्ण : आ.आशुतोष काळे
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा उत्साहात
गाव तिथे विलगीकरण केंद्र सुरू करावे- विवेक कोल्हे

अहमदनगर : मोटर सायकल वरून चाललेल्या दोघांना समोरून येणाऱ्या मोटरसायकल वरील तिघांनी कट मारला व शिवीगाळ करून थांबवून त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली व फरशीचा तुकडा मारू जखमी केले ही घटना बालिकाश्रम रोडवरील कमला हॉस्पिटल समोर घडली. 

याबाबतची माहिती अशी की मयूर विक्रम पाचारणे (वय 28 राहणार बुरुडगाव, अहमदनगर ) आणि भाग्य बुवासाहेब गोरे राहणार भांडे वाडी तालुका कर्जत. हल्ली राहणार बालिकाश्रम रोड अ.नगर ) हे दोघे मोटरसायकल वरून बालिकाश्रम रोडने जात असताना कमला हॉस्पिटल समोर त्यांना समोरून एका मोटरसायकलवर आलेल्या तिघांनी कट मारला व त्यातील एकाने मोठ्याने शिवी घेऊन त्यांना थांबायला सांगितले. त्यामुळे आचार्य व गोरे थांबले असता तिघांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली त्यातील एका मुलाने जवळ पडलेला फरशीचा तुकडा गोरे याच्या डोक्यात मारल्याने तो जखमी झाला यावेळी दोघांनी आरडाओरडा केल्याने त्याचे लोकांची गर्दी झाली त्यांनी काम करणाऱ्या पैकी एकास पकडून ठेवले त्यावेळी अन्य दोघे तेथून पसार झाले. पोलीस आल्यानंतर पोलिसांनी पकडलेल्या मुलास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अमोल भाऊ पाडळे (राहणार डॉन बॉस्को कॉलनी अहमदनगर) असे सांगितले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात उपचार करतात पाठवले. 

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी मयूर पाचारणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल पाडळे व त्याचे आणि दोन साथीदाराविरुद्ध मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली.

COMMENTS