Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वांबोरी घाटात दोघांना मारहाण करून लुटले

अहमदनगर प्रतिनिधी - वांबोरी घाटात डोंगरगण (ता. नगर) शिवारात दोन मित्रांना मारहाण करीत तिघांनी लुटले. दोन तोळ्याची सोन्याची चेन, चांदीचे ब्रॅसलेट,

नगर-मनमाड रोडवरील अपघातात दोघांचा मृत्यू
कर्जत तालुक्यात खुलेआम चालते गावठी दारूची वाहतूक
रेखा जरे यांची हत्या प्रेमसंबधांतून ; बाळ बोठेसह इतर आरोपीविरुद्ध पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर प्रतिनिधी – वांबोरी घाटात डोंगरगण (ता. नगर) शिवारात दोन मित्रांना मारहाण करीत तिघांनी लुटले. दोन तोळ्याची सोन्याची चेन, चांदीचे ब्रॅसलेट, तीन हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल असा 76 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन चोरट्यांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रिश नारायण वर्मा (वय 18 रा. पाईपलाइन रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी क्रिश वर्मा व त्याचे मित्र गाडीवरून वांबोरी घाटातून जात असताना डोंगरगण शिवारात रस्त्यावर अचानक तिघे जण आले. त्यांनी क्रिश व त्यांच्या मित्राला अडविले. मारहाण करीत त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल काढून बळजबरीने काढून घेतला. क्रिश यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, सहाय्यक निरीक्षक निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चाहेर करीत आहेत.

COMMENTS