Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेच्या 40 आमदारांना दोन आठवड्यांची मुदत

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी

सानप वस्ती वरील जि.प.शाळेला शिक्षणाधिकार्‍यांची भेट
प्रभाकर शिरसाठ यांना सहायक फौजदारपदी पदोन्नती
राज्यात चित्रपटाला लवकरच उद्योगाचा दर्जा ; अमित देशमुख

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटांच्या आमदारांना म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार काही आमदारांनी आपले म्हणणेही मांडले होते. काहींचे म्हणणे मांडायचे बाकी होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.

शिवसेनेचे 40 आमदार आता काय उत्तर देतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सर्व आमदार हे अधिवेशनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली होती, त्यामुळे अध्यक्षांनी ही मुदतवाढ दिली आहे. आम्हाला दोन आठवड्याची मुदतवाढ दिलेली आहे. दोन आठवड्यात आम्ही आता उत्तर देणार आहोत, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले होते. हा अध्यक्षांचा अधिकार असल्याचे सांगत कोर्टाने हे प्रकरण निर्धारीत वेळेत निकाली लावण्यास सांगितले होते. पण किती काळात हे प्रकरण निकाली काढायचे अशी स्पष्ट डेडलााईन देण्यात आली नव्हती. मात्र, कोर्टाच्या इतर खटल्यातील निकालानुसार दोन ते तीन महिन्यात हे प्रकरण निकाली निघायला हवे, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. 

COMMENTS