Homeताज्या बातम्यादेश

इराणमध्ये अडकले दोन हजार विद्यार्थी

केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची जेकेएसए विद्यार्थी संघटनेची मागणीश्रीनगर : इराणमध्ये बिघडत चाललेल्या सुरक्षास्थितीमुळे तेथे शिक्षणासाठी गेलेल्या

महासत्तांना जागतिक संतुलन बनवावे लागेल; अन्यथा…!
इराणमधील भारतीयांनी तात्काळ देश सोडावा
‌एलपीजी टंचाई : वास्तव आणि वावड्या!

केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची जेकेएसए विद्यार्थी संघटनेची मागणी
श्रीनगर : इराणमध्ये बिघडत चाललेल्या सुरक्षास्थितीमुळे तेथे शिक्षणासाठी गेलेल्या सुमारे दोन हजार काश्मीरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जम्मू-काश्मीर स्टुडंट्स असोसिएशन (जेकेएसए) यांनी या पार्श्‍वभूमीवर तीव्र चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी तातडीने हस्तक्षेप करून भारतीय विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
संघटनेनुसार, तेहरानमधील भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांना शक्य तितक्या लवकर स्वतःच्या व्यवस्थेने इराण सोडण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, अद्याप कोणतीही औपचारिक, समन्वित किंवा सरकारपुरस्कृत स्थलांतर योजना जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आधीच अस्थिर वातावरणात अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जेकेएसएचे राष्ट्रीय संयोजक नासिर खुएहामी यांनी निवेदनात सांगितले की, इराणमधील झपाट्याने ढासळणारी सुरक्षा परिस्थिती केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर काश्मीरमधील त्यांच्या कुटुंबीयांसाठीही मोठी चिंता ठरत आहे. पालक आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत अस्वस्थ असून, अनिश्‍चिततेमुळे मानसिक तणाव वाढत आहे. संघटनेने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, अशांत आणि धोकादायक परिस्थितीत विद्यार्थ्यांनी स्वतःहून प्रवास व स्थलांतराची व्यवस्था करणे ना सुरक्षित आहे, ना व्यवहार्य. संघटित यंत्रणेचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या क्षमतेवर विश्‍वास व्यक्त करताना जेकेएसएने, परदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी भारत सरकारने यापूर्वी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. मात्र, सध्याच्या संकटाची तीव्रता लक्षात घेता केवळ सल्ल्यापुरते मर्यादित न राहता सक्रिय, समन्वित आणि तातडीचा राजनैतिक हस्तक्षेप आवश्यक असल्याचे संघटनेचे मत आहे. जेकेएसएने केंद्र सरकारकडे स्पष्ट स्थलांतर आराखडा, स्वतंत्र आपत्कालीन हेल्पलाईन तसेच सुरक्षित प्रवास मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून विद्यार्थी सन्मानपूर्वक आणि सुरक्षितपणे मायदेशी परतू शकतील. इराणमध्ये सुरू असलेल्या व्यापक आंदोलन आणि अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय दूतावासाने 14 जानेवारी 2026 रोजी ताजी सूचना जारी करत विद्यार्थी, यात्रेकरू, व्यापारी आणि पर्यटकांसह सर्व भारतीय नागरिकांना उपलब्ध वाहतूक साधनांचा वापर करून शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी इराणमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर काश्मीरी विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीसाठी केंद्र सरकारने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.

COMMENTS