घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली

भंडारा प्रतिनिधी  - घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथ

nashik : पोलिस आयुक्तांनी दिला खांदा
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवे चे उद्घाटन
“तुझं मुळ विसरू नकोस”, झोमॅटोच्या जाहिरातीवरून अल्लू अर्जुन झाला ट्रोल |

भंडारा प्रतिनिधी  – घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली आहे.
सुशील बलवीर डोंगरे (वय ८) व उत्कर्ष बलवीर डोंगरे (वय ११) असे मृत भावंडाचे नाव आहे. दोघाही भावांना उपचारासाठी आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते.  त्यानंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले . मात्र  उपचारादरम्यान थोरला भाऊ उत्कर्ष बलवीर डोंगरे याचा रात्री मृत्यू झाला. तर भंडारा येथून धाकटा भाऊ सुशील बलवीर डोंगरे याला  नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा देखील आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे देव्हाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे.

COMMENTS