Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्रालयातील दोन अधिकारी निलंबित

महिला अधिकार्‍याशी गैरवर्तन प्रकरणी कारवाई

मुंबई : मंत्रालयातील एका महिला अधिकार्‍याबाबत अपमानास्पद विधाने करून विनयभंग केल्याप्रकरणी दोन अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मं

बुलडाणा नगरपरिषदेकडुन महात्मा फुले यांचा होतोय अवमान! LokNews24
रैनिसांस स्टेट पुस्तकावर बंदी घाला; संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन
जामखेडमध्ये डॉक्टर असोसिएशनकडून कोलकाता घटनेचा निषेध

मुंबई : मंत्रालयातील एका महिला अधिकार्‍याबाबत अपमानास्पद विधाने करून विनयभंग केल्याप्रकरणी दोन अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंत्रालयात वरिष्ठ महिला अधिकार्‍यांचा विनयभंग करणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांची निष्पप चौकशी व्हावी, यासाठी त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून कठोर कारवाई करा, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे(Dr. Neelam Gorhe) यांनी केली होती. त्यानंतर या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागातील अवर सचिव दर्जाच्या अधिकार्‍याने उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकार्‍यांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप आहे. त्याच ठिकाणी याच विभागाचे उपसचिव देखील उपस्थित होते. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोर्‍हे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. या कारवाईचे गोर्‍हे यांनी स्वागत केले असून याबाबत संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी केवळ घोषणा न करता निलंबित केल्याचे परिपत्रक जारी करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

COMMENTS