मुंबई प्रतिनिधी - राज्याच्या राजकीय वर्तुळातून आता मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल
मुंबई प्रतिनिधी – राज्याच्या राजकीय वर्तुळातून आता मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटामध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा होती. अजित पवारांच्या शपथविधीमध्ये राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आल्यानंतर शिंदे गटातील आमदार नाराज झाल्याची माहिती आहे. मंत्रिपदावरून शिंदेंच्या दोन आमदारामध्ये बाचाबाची झाली असल्याची वृत्त दिले यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हस्के म्हणाले, “शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही. काल आमची बैठक झाली. यापुढील संघटनात्मक बांधणी कशी असेल, लोकसभेची कशी तयारी करायची आहे? याची चर्चा बैठकीत झाली. काही खोडसाळ बातम्या पसरत आहेत. असा काही विषय नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वैयक्तिक कारणांमुळे दौरावरून परतले आहेत.” दरम्यान, मंत्रिपदावरील दाव्यांमुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली होती, अशी बातमी आली होती. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत:ला मध्यस्थीसाठी यावे लागले. मुंबईत दोन आमदार एकमेकांना भिडले. आमदारांच्या या वादावादीमुळेच शिंदेंना आपला नियोजित नागपूर दौरा सोडून आमदारांचे भांडण सोडवण्यासाठी तातडीने मुंबईला परत यावे लागले, असे सांगण्यात येत आहे. राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार येऊन, आता एक वर्षांपेक्षा अधिक काळ लोटून गेला. मात्र अजूनही सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झालेले नाही. मंत्रिमंडळ पहिल्या विस्तारामध्ये भाजपाचे आणि शिवसेनेचे अनुक्रमे प्रत्येकी ९ मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. मात्र शिंदेंचे इतर आमदार मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. जुलै महिन्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी आशा शिंदे गटाच्या आमदारांना होती. इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आता अजित पवार यांची सरकारमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यांच्या नऊ आमदारांनी शपथही घेतली. यामुळे आता शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता असल्याची जोरदार चर्चा आहे.
COMMENTS