Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चेंबरमधे गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमधील घटना

छत्रपती संभाजीनगर: ड्रेनेज चेंबरमध्ये सफाई करणार्‍या दोन कामगारांचा गुदमरून मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना सलीम अली सरोवर उद्यान

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील : डॉ. भागवत कराड
एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या
मुख्यमंत्र्यांच्या सभेहून परतताना शिवसैनिकाच्या गाडीने चिमुकलीला उडवले ! | LOK News 24

छत्रपती संभाजीनगर: ड्रेनेज चेंबरमध्ये सफाई करणार्‍या दोन कामगारांचा गुदमरून मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना सलीम अली सरोवर उद्यान परिसरातील आहे. या घटनेत चार जण बुडाले होते, माहिती मिळताच त्यांना बाहेर काढण्यात आले. तर त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी टाहो फोडला. याप्रकरणी सिटीचौक पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत अंकुश यांना तीन मुले आहेत, रावसाहेब याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. उपचार सुरू असलेल्या विष्णू याला चार मुले तर बाळू याला दोन मुले एक मुलगी असे कुटुंब असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी, अंकुश बाबासाहेब थोरात (वय 32) राहणार, हिमायत बाग भीमराज नगर, रावसाहेब सदाशिव घोरपडे (वय 33) राहणार भीमराज नगर असे मृत कामगारांचे नाव आहे. तर विष्णू उगले राहणार हिमायतबाग आणि बाळू विश्राम खरात यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. मोल मजुरी मिळाल्याने घेतले काम: चारही जण हे मोल मजुरीचे काम करत होते. मलजल प्रक्रिया केंद्र या ठिकाणी चेंबरचे काम असल्याची माहिती त्यांना मिळाली. रोजगार मिळाल्यामुळे सर्वजण त्या ठिकाणी कामावर गेले. यातील एक जण चेंबरमध्ये बुडाल्यानंतर ही बाब इतर सहकार्‍यांच्या लक्षात आली. त्याला वाचण्यासाठी दुसरा आत गेला पण, तोही बुडाला. तिसरा सहकारी आत गेल्यानंतर तोही त्यात गेला असे करत चारही जण चेंबरमध्ये अडकले. दरम्यान ही बाब मित्रांच्या लक्षात आले. त्यांना अग्निशमन दलाच्या मदतीने चौघांना बाहेर काढत, त्यांना तात्काळ घाटी रुग्णाला दाखल करण्यात आले. यापैकी दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर दोघावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक शिंगारे करीत आहे.

COMMENTS