Homeताज्या बातम्यादेश

छत्तीसगडमध्ये स्फोटात दोन जवानांना वीरमरण

बिजापूर ः छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सुरक्षा दलाच्या दोन जवा

देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या बसला अपघात ; एक ठार, सहा जखमी
अयोध्यानगरमध्ये नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु
तामिळनाडूमध्ये आता मंदिरामध्ये मोबाईलवर बंदी

बिजापूर ः छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सुरक्षा दलाच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे. तर चार जवान जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील नक्षलविरोधी शोध मोहिमेवरून परतत असताना ही घटना घडली.
गडचिरोलीतील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमालगतच्या जंगल परिसरात 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास जवान-नक्षल्यांत चकमक उडाली. यात 12 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. एक उपनिरीक्षक जखमी आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौर्‍यावर होते, त्यांनी जिल्हा सोडताच घनदाट जंगलात हा थरार घडला. त्यानंतर गुरूवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे.

COMMENTS