Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रपुरमध्ये दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

चंद्रपूर ः गोंडपिपरी येथील न्यायालयाच्या मागे तलावात मित्रांसोबत अंघोळीला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा तलावात बुडाल्याची घटना काल दुपारी दोन वाजताच्

पीएम-सूर्य घर योजनेसाठी केंद्राकडून मार्गदर्शक तत्वे जारी
नगरपालिका वाचनालयात डॉ. हेडगेवार यांची जयंती उत्साहात
सावरकरांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान ः मुख्यमंत्री शिंदे

चंद्रपूर ः गोंडपिपरी येथील न्यायालयाच्या मागे तलावात मित्रांसोबत अंघोळीला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा तलावात बुडाल्याची घटना काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. सदर घटना ही रात्री आठ वाजता दरम्यान उघडकीस आली. माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या बालकांची शोधमोहीम हाती घेतली. मात्र वृत्त लिहेपर्यंत मृतकांचा शोध लागला नाही. गौरव विलास ठाकूर वय 14 वर्ष राहणार गोंडपिंपरी शिवाजी चौक, शौर्य भास्कर पिंपळशेंडे वय 15 वर्ष रा. गोंडपिंपरी शिवाजी चौक अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

COMMENTS