जामखेड प्रतिनिधी : पैशाचे व राहण्याचे अमिष दाखवून महिलांना जामखेड पँलेस हाँटेलवर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची गोपनीय माहिती मिळताच जाम
जामखेड प्रतिनिधी : पैशाचे व राहण्याचे अमिष दाखवून महिलांना जामखेड पँलेस हाँटेलवर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची गोपनीय माहिती मिळताच जामखेड–बीड रोडवरील जामखेड पॅलेस हॉटेलवर चालणारया वेश्या व्यवसायावर जामखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली. याठिकाणी ५ महिला व ६ पुरूष आढळून आले.६९९०रूपये व कंडोम पाकीट आढळून आले. कारवाईत दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी आकाश बन्सी चंदन (रा. जामखेड, जि. अहिल्यानगर) व सुरज शिवाजी खवळे (रा. काटेवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी महिलांना हॉटेलमध्ये बोलावून राहण्याची सोय करून दिली. त्यानंतर पैशांचे आमिष दाखवून तसेच बळजबरीने देहविक्री व अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. आरोपींविरोधात गुन्हा क्रमांक 670/2025 नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 143(3) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1959 चे कलम 3, 4, 5 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत कर्जत विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रवीणचंद लोखंडे, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी व पोलिस अधिकारी किशोर गावडे यांनी सहभाग घेतला.
या रँकेटचा आका कोण? हाँटेल मालक कोण?
जामखेड पॅलेस हाँटेल हे खरोखरच हॉटेल म्हणून चालवले जात होते का ? की त्याचा वापर केवळ वेश्या व्यवसायासाठी होत होता? या हॉटेलचा नेमका मालक कोण आहे? कोवीड काळात जामखेड कोवीड सेंटर म्हणून रूग्णांना सेवा देणारया इमारतीत जामखेड पँलेस हाँटेल रूपाने वेश्याव्यवसाय करणारयांचा आका कोणी वेगळाच आहे का? . अनेक वर्षापासुन चालू असलेल्या या व्यवसायाकडे पोलिसांची गोपनीय नजर का गेली नाही? याबाबत नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

COMMENTS