Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीस खेळाडूंनी पटकावले सुवर्णपदक

सब ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत आयडियल ग्रुपच्या खेळाडूंची कामगिरी

अहमदनगर ः येथील वाडिया पार्क क्रीडा संकुल मध्ये तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या सब ज्युनियर व कॅडेट वयोगटातील मुला- मुलीं

एकतर्फी प्रेमातून मुलीला ठेवले डांबून ; नगरच्या एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
संजीवनीचा संघ व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्यात प्रथम
गोदामाई प्रतिष्ठानचे कार्य युवकांसाठी कौतुकास्पद ः माजी मंत्री ढाकणे

अहमदनगर ः येथील वाडिया पार्क क्रीडा संकुल मध्ये तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या सब ज्युनियर व कॅडेट वयोगटातील मुला- मुलींच्या तायक्वांदो स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये आयडियल ग्रुपच्या खेळाडूंनी पदकांची कमाई करून घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील 220 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामधील विजयी झालेल्या खेळाडूंची राज्य तायक्वांदो अजिंक्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सुवर्ण, रौप्य व कास्य पदक पटकाविणार्‍या खेळाडूंचा आयडियल ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत नक्षत्रा नक्का, काव्यश्री शिरापुरी, सार्थक कराळे, शिवराज शिंदे, प्रेक्षा शेळके, सेजल घुले, पुष्कर टाके, विवान चांदणे, स्नेहल आंधळे, योगिता वाघमारे, श्रद्धा ठोंबरे, रुद्र मुसळे, रोहन सानप, मल्हार वाघमोडे, आभास शिंदे, श्रेयश बुरा, अथर्व बुरा, शशांक कुलकर्णी, गणेश वामन, प्रणव माने या खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकाविले. तर श्रीयन वाघ, देवांश वाघ, निल लखापती, स्वराज वाघ, आर्यन जाधव, शिवू झूगे, साई झुंगे, युगंधरा जाधव, शंभवी शिंदे, आरोही वाघमोडे, तनिष्का बोरकुले, प्रनल अरगडे, कृष्णा चौभे, आशिष पाटोळे, हर्षवर्धन कोळपकर, शंतनू सारूक यांनी रौप्य पदकाची कमाई केली. उदय बोडखे, कौस्तुक बोडखे, साई जाधव, अथर्व झुंगे, शिवराज जाधव, शर्वरी वाघ, हार्दिक कराळे, प्रभाग छिंदम, कृष्णा घुले, शौर्य दाने, अनेक चिंचरकर, अनन्या वाघमोडे, साई लोखंडे, शिवांश पाटोळे, वरदान माने यांनी कास्य पदक प्राप्त केले. या विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक घनश्याम सानप यांचे मार्गदर्शन लाभले. यश प्राप्त करणार्‍या खेळाडूंचे तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व उपाध्यक्ष संतोष लांडे यांनी अभिनंदन केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव घनश्याम सानप, राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक गणेश वंजारे, दिनेश गवळी, धर्मनाथ घोरपडे, अल्ताफ खान, राष्ट्रीय पंच योगेश बीचीतकर, अमोल काजळे, प्रशांत पालवे, वैभव आव्हाड, विजय लोंढे, सचिन कोतकर, रोहित काळे, आदेश घोडके, कार्तिक गीते, वैभव जरे, तेजस भाबड, अक्षरा वाणे, ओंकार गागरे, ओम सानप, सार्थक कराळे, ऋषिकेश कांबळे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS