Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीतील विद्यार्थ्याची वाघोली येथे आत्महत्या

वाठारस्टेशन / वार्ताहर : वाघोली, ता. कोरेगाव येथे परीक्षा सुरू असताना बारावीतील पुनर्परीक्षार्थी रोहित पोपट शिंदे (वय 20) या विद्यार्थ्याने राहत्

कराड पालिका ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात कचरा गाड्या उभ्या
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव वन क्षेत्रातील वृक्षतोडीचे खरे सुत्रधार कोण?
म्हसवड पोलिसांकडून वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाई

वाठारस्टेशन / वार्ताहर : वाघोली, ता. कोरेगाव येथे परीक्षा सुरू असताना बारावीतील पुनर्परीक्षार्थी रोहित पोपट शिंदे (वय 20) या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला उपचारासाठी पिंपोड्यातील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त तरुणांनी ग्रामीण रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. आत्महत्येचे अद्याप कारण समजू शकले नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई-वाठार रस्त्यावर वाघोलीत साधना शिंदे या हलाखीच्या परिस्थितीत हॉटेल व्यवसायातून बारावीतील विद्यार्थ्याची कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांना शुभम, विनोद आणि रोहित ही तीन मुले असून, ती शिक्षण घेत आहेत. काल रात्री त्या दिवसभराचे हॉटेलचे काम संपवून घरी स्वयंपाक बनवत होत्या. दरम्यान, रोहित याने त्याच्या खोलीचा दरवाजा बंद करून गळफास घेतला.
सर्वजण घरात असूनही त्याची कल्पना कोणालाही आली नाही. रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यानंतर मित्र व कुटुंबीयांनी त्याला पिंपोडे येथील खासगी व नंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रोहितला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूमुळे धक्क्याने संतप्त झालेल्या जमावाने रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. यामध्ये सॅनिटायझर मशिनसह प्रसूतिगृहाचा दरवाजा फोडला. सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद वाठारस्टेशन पोलीस ठाण्यात झाली आहे.

COMMENTS