Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वरिष्ठांच्या सूचनेनंतर तुषार आपटेंचा राजीनामा

बदलापूर : बदलापूरमधील संवेदनशील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक राजकीय वातावरण आधीच तणावपूर्ण असताना, भाजपमध्ये एक महत्त्वाची घ

धरण व्यवस्थापनाने पाण्याच्या विसर्गाचे काटेकोर नियोजन करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई
बुलडाणा नगरपरिषदेकडुन महात्मा फुले यांचा होतोय अवमान! LokNews24
औसारोडवर झाड तोडण्याचा प्रयत्न; काळ्या मुखपट्टी बांधून ग्रीन लातूर टीमकडून निषेध

बदलापूर : बदलापूरमधील संवेदनशील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक राजकीय वातावरण आधीच तणावपूर्ण असताना, भाजपमध्ये एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणाशी संबंधित सहआरोपी आणि बदलापूर-कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून सूचक संदेश मिळाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, तुषार आपटे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती अवघ्या एक दिवसापूर्वीच करण्यात आली होती. मात्र नियुक्तीनंतर लगेचच विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या. या पार्श्‍वभूमीवर राजीनाम्याची घोषणा झाल्याने बदलापूरसह राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आला आहे. बदलापूर येथील एका शाळेत शिकणार्‍या दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. या प्रकरणात तुषार आपटे यांचे नाव सहआरोपी म्हणून पुढे आले असून ते सध्या जामिनावर आहेत. अशा परिस्थितीत त्यांना नगरपालिकेत स्वीकृत सदस्यत्व देण्यात आल्याने नागरिक, सामाजिक संस्था आणि काही राजकीय घटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत त्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर काही तासांतच या निर्णयावर प्रश्‍न उपस्थित होऊ लागले. पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही नियुक्ती मागे घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. वाढता सामाजिक व राजकीय दबाव लक्षात घेता अखेर आपटेंनी पदत्यागाचा निर्णय घेतल्याचे समजते.

COMMENTS