Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर-भुईबावडा घाटात ट्रक पलटी, मार्गावरील वाहतूक ठप्प

गगनबावडा / प्रतिनिधी : मैद्याची पोती घेऊन जाणारा ट्रक भुईबावडा घाटात पलटी झाला आहे. हा अपघात दुपारी 12 वा. च्या दरम्यान झाला. टायर फुटून हा अपघात

चिंचोली कुस्ती मैदानात ’कौतुक’ ची बाजी, आत्मलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजन
शेतकर्‍यांनो राज्य नको राज्यकर्ते बदला : रघुनाथदादा पाटील याचे आवाहन
मिळकत कर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या मिळकती सिल: थकबाकी भरण्याचे पाचगणी नगरपरिषदेचे आवाहन

गगनबावडा / प्रतिनिधी : मैद्याची पोती घेऊन जाणारा ट्रक भुईबावडा घाटात पलटी झाला आहे. हा अपघात दुपारी 12 वा. च्या दरम्यान झाला. टायर फुटून हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या अपघातामुळे या घाटमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पो. नाईक आर. व्ही. नारणवर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत.
मैद्याने भरलेला ट्रक सिन्नरहून गोव्याकडे चालक सचिन दशरथ शिरसाट घेऊन जात होते. त्यांच्यासोबत क्लिनर विकास अशोक रंगचोरे होते. भुईबावाडा घाटात ट्रक आला असता ट्रकचा पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यामुळे ट्रक रस्त्यात पलटी झाला. या अपघातात मैद्याच्या पिशव्या खोल दरीत गेल्या आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रकचे ही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
………………..

COMMENTS