Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोलेत 750 दिवे लावून त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात

अकोले ः अकोले येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे त्रिपुरा पौर्णिमा देव दिवाळी निमित्ताने 750 दिवे लावून डोळ्यांचे पारणे फेडणारा दीपोत्सव सा

अकोल्यातील लक्ष्मी निवास गृहनिर्माण सोसायटी निवडणुकीत सागर मैड विजयी
कुंभमेळ्यातून आलेल्यांचीही क्लिप घंटागाडीवर लावावी
आ. थोरात यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट

अकोले ः अकोले येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे त्रिपुरा पौर्णिमा देव दिवाळी निमित्ताने 750 दिवे लावून डोळ्यांचे पारणे फेडणारा दीपोत्सव साजरा करण्यात आला.प.पू गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे दिंडोरी दरबार यांचे आशीर्वादाने व मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पाटील गल्ली अकोले येथे प्रति वर्षी तुलसी विवाह सोहळा  उत्साहात साजरा केला जातो.
माऊली सांगतात ज्या उपवर वधू-वरांना योग्य वधू-वर मेळावा म्हणून मुला मुलींनी तुलसी दामोधर विवाह केल्यास पुढील वर्षभरात त्यांचे विवाह योग योग्य ठिकाणी जुळून येतात अशा अनेक अनुभूती सेवेकर्‍यांनी अनुभवल्या आहेत. याही वर्षी आठ मुला मुली या तुलसी विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. तसेच त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी भगवान शिवजी ने त्रिपूरासुराचा वध करून विजय मिळवला होता म्हणून सर्व देवतांनी काशी तिर्थक्षेत्र वर मातीच्या पणती चे दिवे लावून दिपोत्सव साजरा केला. हा उत्सव देवदिवाळी या नावाने ओळखला जातो .याच दिवशी कृतिका नक्षत्र वर कार्तिक स्वामी चे दर्शन घेऊन आशिर्वाद प्राप्त करून घेतले जातात. या त्रिवेणी संगमाचा आनंदोत्सव अकोले येथील श्री स्वामी समर्थ वेणीसेवा केंद्रातील सेवेकर्‍यांनी 750 मातीच्या पणत्या लावून डोळ्या चे पारणे फेडणारा दिपोत्सव साजरा केला. या त्रिवेणी संगम सोहळ्यानिमित्ताने महिला व पुरुष व बाल सेवेकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दीपोत्सवाचा आनंदोत्सव साजरा केला.

COMMENTS