नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयातील विद्युत भवन येथे आज मंगळवारी (१२ मार्च) रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच
नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयातील विद्युत भवन येथे आज मंगळवारी (१२ मार्च) रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता योगेश निकम व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहय्यक महव्यवस्थापक महेश बुरंगे, अतिरिक्त कार्यकारी हर्षवर्धन जगताप, उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS