शेवगावात संयुक्त वाहन तपासणी मोहिम; दंडात्मक कारवाई शेवगाव : शेवगाव शहर व तालुक्यात अलीकडच्या काळात वाहन अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. विशेषतः अपघातग्रस्त वाहनांना नंबर प्लेट नसणे, नियमबाह्य बदल केलेली वाहने तसेच ऊस तोड हंगामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धावणारे ट्रॅक्टर ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा परिवहन विभागाने अपघातांना आळा घालण्यासाठी ॲक्शन मोडवर येत जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहन तपासणी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत सोमवारी (दि. २) शेवगाव शहरातील नित्यसेवा हॉस्पिटल चौकात शेवगाव पोलीस ठाणे व परिवहन विभाग, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापक वाहन तपासणी करण्यात आली. या कारवाईत चारचाकी वाहनांवर लावलेल्या बेकायदेशीर काळ्या रंगाच्या फ्रेम काढून टाकण्यात आल्या तसेच संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय अतिरिक्त भार वाहतूक, विना नंबर चारचाकी व दुचाकी वाहने अशा विविध कलमांखाली अनेक वाहनांवर दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गोरक्ष कोरडे, विलास धुम तसेच शेवगाव वाहतूक शाखेचे पोलीस राहुल खेडकर, दीपक खैरनार व पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ शिरसाट आदींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शेवगावात संयुक्त वाहन तपासणी मोहिम; दंडात्मक कारवाई
शेवगाव : शेवगाव शहर व तालुक्यात अलीकडच्या काळात वाहन अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. विशेषतः अपघातग्रस्त वाहनांना नंबर प्लेट नसणे, नियमबाह्य बदल केलेली वाहने तसेच ऊस तोड हंगामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धावणारे ट्रॅक्टर ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा परिवहन विभागाने अपघातांना आळा घालण्यासाठी ॲक्शन मोडवर येत जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहन तपासणी मोहिम हाती घेतली आहे.
या मोहिमेअंतर्गत सोमवारी (दि. २) शेवगाव शहरातील नित्यसेवा हॉस्पिटल चौकात शेवगाव पोलीस ठाणे व परिवहन विभाग, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापक वाहन तपासणी करण्यात आली. या कारवाईत चारचाकी वाहनांवर लावलेल्या बेकायदेशीर काळ्या रंगाच्या फ्रेम काढून टाकण्यात आल्या तसेच संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय अतिरिक्त भार वाहतूक, विना नंबर चारचाकी व दुचाकी वाहने अशा विविध कलमांखाली अनेक वाहनांवर दंड ठोठावण्यात आला.
ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गोरक्ष कोरडे, विलास धुम तसेच शेवगाव वाहतूक शाखेचे पोलीस राहुल खेडकर, दीपक खैरनार व पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ शिरसाट आदींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

COMMENTS