Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंडमध्ये अलकनंदा नदीच्या काठावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, १५ जणांचा मृत्यू

उत्तराखंड - उत्तराखंडमध्ये मोठी घटना घडली आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. या घटनेमध्ये १५ जणांचा दुर्दैवी मृत्

समृद्धी महामार्ग श्रीमंतांसाठीचाच… ५२० किमीचा ८३० रुपयांचा टोल…
संतापलेल्या बैलाचा तरुणावर हल्ला
बीडमध्ये तीन बालकांचा मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज | LokNews24

उत्तराखंड – उत्तराखंडमध्ये मोठी घटना घडली आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. या घटनेमध्ये १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार पोलिसांचा समावेश आहे. घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली असून स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चमोली जिल्ह्याल्या अलकनंदा नदीच्या काठावर ही घटना घडली आहे. अचानक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. चमोलीचे एसपी परमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत

उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळेच ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि ३ होमगार्डचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. वीज प्रकल्पात बांधण्यात आलेल्या पुलाला विजेचा धक्का लागल्याने हा अपघात झाला. आधी जल निगमच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर इतरांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा देखील मृत्यू झाला.

उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही मुरुगेसन यांनी सांगितले की, ‘पोलिस उपनिरीक्षक आणि पाच होमगार्डसह जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे की, रेलिंगवर करंट होता. तपासात पुढील तपशील समोर येतील.’

COMMENTS