लातूर प्रतिनिधीः- जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी राज्य कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय

लातूर प्रतिनिधीः- जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी राज्य कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिका व कर्मचारी संघटना दुसर्या दिवशीही सहभागी होते. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील आरोग्यसेवेवर काहीसा प्रभाव झाला आहे. दरम्यान, तीन नर्सिंग महाविद्यालयांचे प्रशिक्षित विद्यार्थी रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी धावून आल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे 750 खाटांचे आहे. चांगल्या आणि दर्जेदार आरोग्यसेवेमुळे जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील आणि कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या सीमावर्ती भागातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात जवळपास 1300 रुग्णांची दररोज नोंदणी होते. याशिवाय, आंतररुग्ण विभागात जवळपास 500 रुग्ण उपचारासाठी दाखल असतात. राज्य कर्मचारी संघटनेच्या बेमुदत आंदोलनात बुधवारी वैद्यकीय महाविद्यालयातील 27, तर रुग्णालयातील 447 परिचारिक, तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. संपाचा रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये म्हणून वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक ती दखल घेतली होती. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात नेहमीप्रमाणे रुग्ण नोंदणी व तपासणी सुविधा सुरू आहे.
COMMENTS