शेवगाव तालुका ः मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे चालु असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भातकुडगाव फाटा चौफु

शेवगाव तालुका ः मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे चालु असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भातकुडगाव फाटा चौफुल्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सरकारने मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने केलेल्या मागण्या मान्य करून दादांचे उपोषण तात्काळ सोडावे अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. वतीने यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी मराठा सेवक चंद्रकांत महाराज लबडे, राजेंद्र आढाव पाटील, रामजी शिदोरे, अशोक देवडे यांच्या हस्ते शेवगाव तहसीलचे तहसीलदार प्रशांत सांगडे व शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने निवेदन स्वीकारल्यानंतर रस्ता रोको स्थगित करण्यात आला. यावेळी राजमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
COMMENTS