Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी वाहतूक ब्लॉक

मुंबई / प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर साखळी क्रमांक कि. मी 15.75

नायब तहसिलदार यांच्या वाहनाचा अपघात;मोटरसायकल स्वार गंभीर जखमी
अहमदनगर जिल्‍ह्याचे नवनियुक्‍त जिल्‍हाधिकारी  यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे घेतले दर्शन
अल्पवयीन मुलाला मिळाली होती सलमानच्या हत्येची सुपारी

मुंबई / प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर साखळी क्रमांक कि. मी 15.750 येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम मंगळवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हाती घेणार आहे. मंगळवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामादरम्यान मंगळवारी द्रुतगती महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल.

द्रुतगती मार्गावरून पुणे-मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किमी 55.000 वरून वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या जुना पुणे-मुंबई मार्गावरून मार्गस्थ होतील. द्रुतगती मार्गावरून पुणे-मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट कि. मी. 39.800 येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या जुना पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेंडूग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ होतील.

COMMENTS