नगरमध्ये व्यापार्‍यांनी बंद पाळून जीएसटीचा केला निषेध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये व्यापार्‍यांनी बंद पाळून जीएसटीचा केला निषेध

अहमदनगर/प्रतिनिधी : अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर लागलेल्या जीएसटीच्या विरोधात आडत व्यापार्‍यांनी शनिवारी (16 जुलै) नगर शहरात बंद पाळला. जीवनावश्यक

Sangamner : वाळू तस्कराने घेतला चिमुकल्याचा जीव | LOKNews24
तांदळी दुमाला ग्रामपंचायतीचा विकास कामांचा सपाटा सुरूच
आमदार रोहित पवार यांच्या कामामुळे जनतेचा विश्‍वास

अहमदनगर/प्रतिनिधी : अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर लागलेल्या जीएसटीच्या विरोधात आडत व्यापार्‍यांनी शनिवारी (16 जुलै) नगर शहरात बंद पाळला. जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने कुलूपबंद असल्याने व्यापारी व्यवहार ठप्प झाले. हमालांच्या हातगाड्याही मालवाहतुकीचे काम नसल्याने रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्या होत्या.

अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र सरकारने पाच टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका व्यापारी व सर्वसामान्य जनतेला बसणार असल्याने या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण भारतभर शनिवारी (दि 16 जुलै) व्यापार बंद पुकारला होता. यामध्ये सहभाग घेताना नगर शहरामधील व्यापार्‍यांनीही कडकडीत बंद ठेवून केंद्र सरकारच्या जीएसटी निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली. या भारत बंद आंदोलनाच्या भूमिकेत नगर शहरातील व्यापार्‍यांनी सहभाग नोंदविला व स्वतःचे व्यापारी व्यवहार बंद ठेवले. यावेळी व्यापारी संतोष बोरा, राजेंद्र बोथरा, अशोक गांधी, अशोक भंडारी, सतीश गुंदेचा, संजय लोढा, सुरेश भंडारी, गोपाळ मणियार, राजकुमार शेटीया, अतुल शेटीया, रितेश पारीक, संजय लोढा, राकेश मेहतांनी, प्रेमराज पितळे, दीपक बोथरा, प्रकाश फिरोदिया, शिवकांत हेडा उपस्थित होते.

केंद्र सरकारने 2017 साली व्यापार्‍यांना सांगितले होते की, अन्नधान्य व खाद्य वस्तंवर जीएसटी कर लावण्यात येणार नाही. त्यामुळे या सर्व वस्तू करमुक्त होत्या. त्यानंतर ब्रँडेड वस्तूंवर कर लावला व आता तर अन्नधान्य व खाद्य वस्तूंवर पाच टक्के जीएसटी कर लावल्यामुळे व्यापार्‍यांसह शेतकरी व सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघणार आहे, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पूर्वी जीवनावश्यक खाद्य वस्तूंवर कुठलाही कर नव्हता मात्र 18 जुलै रोजी या वस्तूंवर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पॅकिंग केलेल्या आणि लेबल लावलेल्या डाळी, कडधान्य, आटा, रवा, मैदा, दुधाचे पदार्थ या सर्व वस्तूवर 5 टक्के जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे हा जीएसटीचा निर्णय रद्द करण्याची मागणी व्यापार्‍यांकडून करण्यात आली असून, त्यासाठी शनिवारी नगरसह देशभर व्यापार्‍यांनी बंद पाळला.

COMMENTS