Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यटन मंत्र्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करण्याची गरज : आ. शशिकांत शिंदे

सातारा / प्रतिनिधी : पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांची शिवरायांशी तुलना केल्यानंतर आता मंत्री लोढा यांच्यावर शिवप्रेमींकडून

महागाईसह इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह बैलगाडी चालवून निषेध
दिग्गज कलाकारांच्या अदाकारीने शुक्रवारी रंगणार औंध संगीत महोत्सव
एसटी बसद्वारे आषाढीसाठी मानाच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थानl LokNews24

सातारा / प्रतिनिधी : पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांची शिवरायांशी तुलना केल्यानंतर आता मंत्री लोढा यांच्यावर शिवप्रेमींकडून टीकेची झोड उठली आहे. आ. शशिकांत शिंदेंनी त्यांच्यावर तोफ डागली आहे. अक्कलशून्य असलेल्या लोढा यांनी शेवटी इतिहासाबद्दल आपले अज्ञान दाखवलेच. त्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करणे गरजेचे आहे, असे आमदार शिंदे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुक्यातील किल्ले प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या वेळी पर्यटनमंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची तुलना शिवरायांनी आग्य्राहून केलेल्या सुटकेशी केली. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावर आमदार शिंदे यांनी लोढा यांच्यावर तोफ डागली.
माजी मंत्री आ. शिंदे म्हणाले, शिवराय आग्रामधून बाहेर पडले तसेच एकनाथ शिंदे बाहेर पडले, असे वक्तव्य लोढा शिवप्रताप दिनानिमित्त आयोजित समारंभात केले. अक्कलशून्य असलेल्या लोढा यांनी शेवटी इतिहासाबद्दल आपले अज्ञान दाखवले. अशा प्रकारे इतिहासाचा संदर्भ देऊन मुख्यमंत्र्यांच्या कृत्याची बरोबरी छत्रपती शिवरायांच्या आग्य्राहून केलेल्या सुटकेच्या प्रसंगाशी केली. अशा प्रकारच्या पर्यटन मंत्र्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करणे गरजेचे आहे. आता तरी शिवप्रेमींनी उठा, जागे व्हा, एकीने विरोध करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
लोढांना जिल्हाबंदी : राजेंद्र शेलार
मंत्री लोढा यांनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी तळहातावर प्राण घेऊन लढलेल्या मावळ्यांचा घोर अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा यापुढे त्यांना जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही. त्यातूनही ते कोणाच्या आधाराने आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार यांनी दिला आहे. शिवप्रतापदिनी प्रतापगडावरील कार्यक्रमात बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी जाणीवपूर्वक छत्रपतींचा अपमान केला आहे. सातार्‍यातील जनता यापुढे स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

COMMENTS