Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपहरण केलेल्या महिलेवर सलग पाच दिवस अत्याचार

श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथील घटना गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा ः राहुरी बसस्थानकासमोरुन अपहरण करुन विवाहीत महिलेवर सलग पाच दिवस श्रीरामपूर येथिल गोंधवणी येथे बळजबरी करुन पिडीत महिलेवर बलात्कार

जिल्ह्याला कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचे पुरेसे डोस तातडीने द्यावेत
यंदा जायकवाडी धरणामध्ये पाण्याची मोठी तूट – इंजि. चकोर
दिल्लीत 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

देवळाली प्रवरा ः राहुरी बसस्थानकासमोरुन अपहरण करुन विवाहीत महिलेवर सलग पाच दिवस श्रीरामपूर येथिल गोंधवणी येथे बळजबरी करुन पिडीत महिलेवर बलात्कार करण्यात आला. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथिल कार्तीक नानासाहेब सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        
           याबाबत पोलिस सुञाकडून समजलेली माहिती अशी की, श्रीरामपुर तालूक्यातील रहिवाशी असलेली सध्या राहुरी तालुक्यात राहत असलेली 34 वर्षीय विवाहित महिले बरोबर सासरी असताना वडाळा महादेव ता.श्रीरामपूर येथिल कार्तीक सोनवणे या तरुणाशी दोन वर्षापूर्वी ओळख झाली होती. गेल्या सहा महीन्यापासुन दोघात प्रेम संबंध निर्माण झाले. पती बरोबर भांडण झाल्याने पिडीत महिला काही दिवसांपासून राहुरी येथील एका गावात माहेरी राहत आहे. 9 जून 2024 रोजी दुपारच्या दरम्यान पिडीत महिला कामानिमित्त राहुरी राहुरी शहरात आली होती. तेव्हा आरोपी कार्तीक सोनवणे याने तीला फोन करून राहुरी बस स्थानका समोर भेटायला बोलावले. तेव्हा पिडीत महिला कार्तीक सोनवणे याला राहुरी बस स्थानकासमोर भेटली. तेव्हा तो म्हणाला की, तू माहेरी काय करते माझ्या सोबत चल, मी तुझ्या सोबत लग्न करेल, तुला सुखात ठेवील. असे गोड बोलुन त्याने पिडीत महिलेला चारचाकी गाडीत बसवून श्रीरामपुर तालूक्यातील गोंधवणी येथिल त्याच्या रुमवर घेवुन गेला. पिडीत महिलेवर बळजबरी करुन तिच्या इच्छेविरुद्ध सलग पाच दिवस बलात्कार केला.मी तुझ्याशी शारिरीक सबंध केले, हे कोणाला सांगु नको.नाहीतर मी तुझ्या जावयाना आपल्या प्रेम प्रकरणा बद्दल सर्व काही सांगेल आणि तुझ्या मुलींचा संसार मोडीन अशी धमकी देवून  निमुटपणे या रुममध्ये माझ्या सोबत रहायचे आणि मला शरिर सुख द्यायचे. सलग पाच दिवस कार्तीक सोनवणे याने पिडीत महिलेवर अनेक वेळा बलात्कार केला. दरम्यान पिडीत महिला हरविल्याची तक्रार राहुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. पोलिस पथकाने पिडीत महिलेचा शोध घेऊन तीला राहुरी येथे आणले.त्यानंतर कार्तीक सोनवणे याने बळजबरीनेचारचाकी गाडीत बसवून नेवून माझ्या इच्छे विरुद्ध बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाल्याने.पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी कार्तीक नानासाहेब सोनवणे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपुर. याच्यावर गून्हा रजि. नं. 713/2024 भादंवि कलम 376 (2) (एन), 363, 366, 343 अपहरण बलात्कार तसेच अनुसूचीत जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, 1989 चे कलम 3(1)(डब्लू)(ळ), 3(1)(डब्लू)(ळळ), 3(2)(व्हिए) प्रमाणे ट्रोसीटीचा गून्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास श्रीरामपुरचे पोलिस उपअधिक्षक डाँ. बसवराज शिवपूजे हे करीत आहे.

COMMENTS