Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचा आ. जयंत पाटील यांना पाठिंबा

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी इस्लामपूर येथे बैठक घेऊन इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास

धुळोबा डोंगरावर ट्रेकिंग करताना व्यावसायिक सुहास पाटील यांचा मृत्यू
जावळीच्या ओझरे शाळेला भारत सरकारचा स्वच्छ विद्यालयाचा दुसरा पुरस्कार जाहीर
त्र्यंबकेश्‍वरला आजपासून व्हीआयपी दर्शनाची सुविधा बंद

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी इस्लामपूर येथे बैठक घेऊन इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा मुख्य घटक पक्ष आहे. जातीयवादी, महाराष्ट्र विरोधी पक्षांना सत्ते वरून खाली खेचणे, ही पक्षाची भूमिका आहे. मात्र, कोणीतरी वेगळी भूमिका घेत असेल, तर त्यांना पक्ष विरोधी भूमिका घेण्याचा अधिकार नाही. त्यांच्यावर कोणी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. मनीषा रोटे, इस्लामपूर शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, उपाध्यक्ष अ‍ॅड. आकीब जमादार, जिल्हा प्रतिनिधी अ‍ॅड. आर. आर. पाटील, स्वयंरोजगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष, धनंजय कुलकर्णी, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, महिला तालुकाध्यक्ष रंजना माळी प्रामुख्याने उपस्थित होते.
बाळासाहेब पाटील म्हणाले, भाजपाचे सरकार सर्व आघाडीवर अपयशी ठरले असून त्यांनी राज्याची वाट लावलेली आहे. आपणास पुन्हा एकदा स्वाभिमानी, वैभवशाली महाराष्ट्र घडवायचा आहे. आम्ही आ. जयंत पाटील यांच्या प्रचारात सक्रीय आहोत. कोणी वेगळी भूमिका न घेता आ. जयंत पाटील यांच्या प्रचारात सहभागी व्हावे. आ. जयंत पाटील हे सुसंस्कृत, अभ्यासू, निष्ठावान आणि कर्तृत्ववान नेते आहेत. त्यांना राज्याच्या सर्वोच्च पदाची संधी आहे. आम्ही त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यात मोलाचे योगदान करू.
अ‍ॅड. मनिषा रोटे म्हणाल्या, राज्यात आमच्या माता-भगिनी, मुली सुरक्षित आहेत का? या सरकारने महिलांना 1500 रुपयांचे प्रलोभन दिले आहे. मात्र, आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही महिलां ना 3 हजार देवू, एसटी प्रवास मोफत करू.
याप्रसंगी शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, अ‍ॅड. आकीब जमादार, अ‍ॅड. आर. आर. पाटील, धनंजय कुलकर्णी, रंजना माळी यांनी पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी सेवा दलाचे जिल्हा संघटक सुरेश कांबळे, तालुका संघटक भाऊसाहेब पाटील, तालुका सदस्य हिंमत कांबळे, सोनम पाटील, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष संदीप मोहिते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS