Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजच्या राजकारण्यांची शाहू महाराजांचा आदर्श घ्यावा

लातूर प्रतिनिधी - आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात शाहू महाराजांचे नाव आदर्श राजा, बहुजन व दलित समाजाचे नेते, प्रजाहितदक्ष राजा अशा संबोधनांनी उल

14 उपप्रकल्प उभारणीसाठी 21 कोटींचे अनुदान
शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सुटण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजन
किनगाव बसस्थानकात पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय

लातूर प्रतिनिधी – आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात शाहू महाराजांचे नाव आदर्श राजा, बहुजन व दलित समाजाचे नेते, प्रजाहितदक्ष राजा अशा संबोधनांनी उल्लेखित केले जाते. आजच्या राजकारण्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन प्राचार्य केंंद्रे यांनी केले. राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलातील राजमाता जिजामाता विद्यालय, तुळजाभवानी विद्यालय व संगमेश्वर विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, प्रा. कविता केंद्रे, मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, अश्विनी केंद्रे, समन्वयक वैशाली केंद्रे, राजेंद्र जायेभाये, राजीव मुंढे, प्रा. बी. बी. खटके, प्रा. एस. आर. धुमाळ, प्रा. एस. एम. जाधव, प्रा. ए. एस. खोत, प्रा. वैशाली पाटील, आर. पी. मुंडे यांच्यासह शिवकांत वाडीकर, विष्णू कराड, परमेश्वर गित्ते उपस्थित होते. तसेच छत्रपती शाहू महाराजांचा स्मृतिदिन साजरा करून शाळेचा शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षातील विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करून त्यांना गुणपत्रक वाटप करण्यात आले.
लोकनेते राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाईसाहेब यांनी यशवंतराव यांना दत्तक घेतले. दत्तक घेतल्यानंतर यशवंतराव यांचे नाव शाहू छत्रपती असे ठेवण्यात आले, हेच राजर्षी शाहू महाराज होत. कोल्हापूर संस्थानाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेसाठी विविध योजना आखून जनतेच्या कल्याणाचे कार्य सुरू केल्याचे सांगून प्राचार्य डी. एन. केंद्रे म्हणाले की, शाहू महाराजांनी शिक्षणाप्रमाणेच समाजातील जातिभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी संस्थानातील सार्वजनिक पाणवठे आणि मंदिरे सर्वांसाठी खुली केली. गंगाराम कांबळे या महार व्यक्तीला कोल्हापूर शहरात भररस्त्यावर हॉटेल घालून दिले. शाहू महाराज सर्व जातीतील लोकांबरोबर हॉटेलमध्ये चहा घेत असत. त्या काळात बहुजन समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. समाजाच्या तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी शाहू महाराजांनी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. 1917 साली शिक्षण सर्वांसाठीच मोफत आणि सक्तीचे केले. संस्थानात विविध जाती-धर्मातील विद्यार्थ्यांसाठी बावीस वसतिगृहे उभारली. खेडोपाडी शाळा उभारल्या. मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती जाहीर केल्या. त्यांनी संस्थानात खास मुलींच्या स्वतंत्र शाळा स्थापन केल्या. त्यांनी शेतीच्या विकासाच्या प्रयत्नांमुळेच आजचा शेतकरी महाराष्ट्रात आदर्श ठरला. शेतीली पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी प्रथम प्राधान्य दिले. यासाठी भोगावती नदीवर धरणाची पायाभरणी केली. 1920 साली डॉ. आंबेडकर यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे परत यायचे होतं तेव्हा, लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदतीची आवश्यकता होती. त्यांना शाहू महाराज व इतर लोकांच सहकार्य मिळालं. याची मदत डॉ. आंबेडकर यांना आपलं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठातील ऊर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी झाली, असे ते म्हणाले.

COMMENTS