Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पतीवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी महिलेचे टॉवरवर चढून केले शोले स्टाईलने आंदोलन

बुलढाणा प्रतिनिधी - मेहकर पोलीस स्टेशन हद्दीतील सारंगपूर मधील गावातील एका महिलेच्या खोट्या तक्रारीवरून माझ्या पतीवर दाखल केलेल्या छेडछाड

पतसंस्थांना को-ऑप. ग्रीन सोसायटी बनविण्याचा शुभारंभ समतापासून
‘दिल की धडकन’ माधुरी दीक्षित पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत
उद्धव ठाकरे यांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

बुलढाणा प्रतिनिधी – मेहकर पोलीस स्टेशन हद्दीतील सारंगपूर मधील गावातील एका महिलेच्या खोट्या तक्रारीवरून माझ्या पतीवर दाखल केलेल्या छेडछाडीचे गुन्हे मागे घेण्यात यावे व माझी तक्रार न दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाय, पोलीस कॉन्स्टेबल नबी यांना निलंबित करण्यात यावे. या मागणीसाठी सारंगपूर येथील रुख्मिणी  गजानन बोरकर या महिलेने मेहकर तहसील कार्यालयाच्या आवारातील 40 फूट उंच टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.जो पर्यंत माझ्या मागणीची दखल घेतली जाणार नाही.तोपर्यंत आंदोलन करीत राहणार असल्याचा पवित्रा या महिलेने घेतला आहे.3 मार्चला पोलीस स्टेशनला निवेदन देऊन ही चौकशी करण्यात आली नसल्याने टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.

COMMENTS