बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघात मागील काही महिन्यापासून निसर्गाचा मोठा प्रकोप झाला असून यामुळे शेतकर्यांचे हाता तोंडाशी आलेला घ
बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघात मागील काही महिन्यापासून निसर्गाचा मोठा प्रकोप झाला असून यामुळे शेतकर्यांचे हाता तोंडाशी आलेला घास आणि अवकाळी पावसामुळे हिरवला आहे. त्यातच कांदा उत्पादक शेतकर्यांचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या संदर्भात मी वेळोवेळी संबंधित मंत्र्यांशी पत्र व्यवहार करून नुकसान भरपाईची सातत्याने मागणी केली होती. याला काही प्रमाणात यश आले असून विधानसभा जिल्हा तसेच राज्यासाठी राज्य शासनाने दि.1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 दरम्यान विक्री करण्यात आलेल्या कांद्यास व उत्पादक शेतकर्यांना अनुदान जाहिर करण्यात आलेले आहे. कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईचा लाभ घेण्यासाठी ई-पीक नोंदणीचे अट शिथिल करणे गरजेचे असून याकरिता राज्य शासनाकडे पत्र व्यवहार करून मागणी केली असल्याची माहिती आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
आपल्या प्रसिद्धीपत्रकात आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, सदरील अनुदान पात्र साठी शेतकरी बांधवांना 7/12, कांदा विक्रीची पावती आणि ई-पीक पेरा नोंद असणे अनिवार्य करण्यात आले आहे. बहुतांश कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी ई-पीक पेरा नोंद केल्याचे दिसून येत नाही. तसेच पणन महासंचालनयालयाने देखिल ई-पीक पेर्याची अट कायम ठेवली आहे. ई-पीक पेरासाठी जवळ-जवळ सगळ्यात ठिकाणी वीज व इंटरनेटच्या अभावामुळे शेतकरी बांधवांना यासाठी असंख्य अडचणी येत आहेत व आलेल्या आहेत. माझ्या मतदार संघातील शेतकरी बांधवांना आलेल्या अडचणीच्या बाबतीत त्यांनी माझ्याकडे या बाबत अनेक अर्ज दिलेले आहेत. राज्य शासन,पणन महासंचालनालयाने ई-पीक पेरा नोंदणी असल्याची घातलेली अट शिथील करून खरीप व रब्बी हंगामातील कांदा उत्पादक शेतकर्यांना नियमोचीत अनुदान द्यावे तरच शेतकरी बांधवांना याविषयी आर्थिक मदत होईल. अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, कृषी मंत्री, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, कृषी आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी बीड, जिल्हा कृषी अधिकारी बीड केली असल्याची माहिती आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रसिद्ध पत्रकातून केली आहे.
COMMENTS