Homeताज्या बातम्याविदेश

बाळाचे रडणं थांबवण्यासाठी आईने चक्क दुधा ऐवजी पाजली दारू

कॅलिफोर्निया प्रतिनिधी - जगभरात आईची तुलना ईश्वरासह केली जाते. संस्कृतमध्ये एक ओळ तुम्ही ऐकली असेल, ”कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति” या

नाशिकमध्ये उष्णतेच्या झळा, ३५ अंश सेल्सिअपेक्षा अधिक तापमान 
आमचे वैचारिक व्यासपीठ एकच – उद्धव ठाकरे
राज ठाकरेंचे ट्वीट; शिंदेना अभिनंदन आणि सावधानतेचा इशारा.

कॅलिफोर्निया प्रतिनिधी – जगभरात आईची तुलना ईश्वरासह केली जाते. संस्कृतमध्ये एक ओळ तुम्ही ऐकली असेल, ”कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति” या ओळीचा अर्थ असा,की एकवेळ पुत्र कुपुत्र (वाईट मुलगा) असू शकतो पण माता कधीही कुमाता (वाईट आई) असू शकत नाही. पण याला अपवाद ठरणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते असे मानले जाते पण सध्या एका आईवर स्वत:च्या बाळाचा जीव धोक्यात टाकल्याचा आरोप लावण्यात आला आहे. बाळाचे रडणे थांबवण्यासाठी आईने ओलांडल्या सर्व मर्यादा न्यूयॉर्क पोस्टनुसार, बाळ सतत रडत असल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी एका आईने त्याच्या दुधाच्या बाटलीमध्ये दारून ओतून त्याला पाजली. त्यानंतप ७ आठवड्याच्या चिमकुलीला दारूची नशा चढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

COMMENTS