मुंबई : शेअर बाजारातून श्रीमंत होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेकजण आपल्या आयुष्याची जमापुंजी या शेअर बाजारात गुंतवतात.

मुंबई : शेअर बाजारातून श्रीमंत होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेकजण आपल्या आयुष्याची जमापुंजी या शेअर बाजारात गुंतवतात. मात्र हाती धुपापणे येते. याचे कारण म्हणजे शेअर बाजारातील अस्थिरता, अपुरी माहिती, त्यामुळे अनेक जण शेअर बाजारात आपला पैसा गमावतांना दिसून येतो. मात्र अशाच एका तरूणाने शेअर बाजारचे व्यसन सोडवण्यासाठी चक्क व्यसनमुक्ती केंद्राची वाट धरली आहे.
एका व्यक्तीने दारू किंवा जुगार नव्हे तर चक्क शेअर मार्केटचे व्यसन सोडण्यासाठी थेट रुग्णालयात धाव घेतली आहे. आपल्या धोकादायक व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी या व्यक्तीने बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेसच्या व्यसनमुक्ती विभागात धाव घेतली आहे. सुमारे 30 लाख रुपये गमावल्यानंतर या व्यक्तीने वैद्यकीय मदत मदत मागितली असून त्याची प्रकृती पाहून कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला.
डॉक्टर मनोज कुमार शर्मा म्हणाले की, या रुग्णासाठी आम्हाला जुगार किंवा गेमिंगच्या व्यसनाने ग्रस्त असलेल्या लोकांपेक्षा वेगळा उपचार पध्दतीचा अवलंब करावा लागला. आमच्यासाठी अशी ही पहिलीच केस होती. त्यांनी म्हटले की रुग्ण हा नवीन व्यापारी नसून गेल्या चार वर्षांत त्याने शेअर बाजारातून प्रचंड नफाही कमावला होता. बाजारातील त्याच्या अंदाजांबद्दल तो इतका दृढ होता की बाजार खराब असतानाही त्याने व्यापार सुरू ठेवला आणि अखेरीस गोष्टी खराब होऊ लागल्या. मात्र, इथेतही तो थांबला नाही. दरम्यान, अहवालानुसार या व्यक्तीने फक्त आपल्या आयुष्यभराची कमाईच बाजारात गुंतवली नाही, तर आपल्या व्यसनापोटी त्याने लोकांकडूनही कर्ज घेतले. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनावर विपरित परिणाम झाला, ज्यानंतर कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्याच्या उपचारांतर्गत या व्यक्तीने आतापर्यंत दोन सत्रे अटेंड केली आहेत.
COMMENTS