देवळाली प्रवरा : अनैतिक संबधातुन वाद विकोपाला गेले.तु मला सांभाळले नाही तर तुझ्या खोटे गुन्हे दाखल करील. प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने त
देवळाली प्रवरा : अनैतिक संबधातुन वाद विकोपाला गेले.तु मला सांभाळले नाही तर तुझ्या खोटे गुन्हे दाखल करील. प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने तिचा खून करत शीर धडावेगळे केले. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी गावाच्या शिवारात पंचमुखी महादेव मंदिर परिसरात डोंगराजवळ बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली.खुन केल्यानंतर प्रियकर स्वतःहुन वांबोरी पोलिस चौकीत हजर होवुन खुनाची कबुली दिली. राहुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील वांबोरी गावाच्या शिवारात पंचमुखी महादेव मंदिर परिसरातील डोंगराजवळ बुधवारी साडेसातच्या दरम्यान घडली.रात्री साडेदहाच्या दरम्यान खुन करुन वांबोरी पोलिस चौकीतहजर झाल्याने खुना प्रकार उघडकीस आला.घटनास्थळी एका महिलेचा शीर धडावेगळे केलेला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.वांबोरी पोलिस चौकीच्या पोलिसांनी खुनाची खात्री करुन घेवून राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना घटनेची माहिती दिली.पोलिस निरीक्षकांसह तपास पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील मृतदेहाची पाहणी केली.कोयत्याच्या साहाय्याने धडावेगळे शिर करुन खुन करण्यात आला.मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
या घटनेतील मयत सोनाली राजु जाधव, वय २८ वर्षे, रा. पोखरी ता. आंबेगांव, जि. पुणे हिचे सखाराम धोंडीबा वालकोळी, वय ५३ वर्षे, रा. निरगुडसर, ता. आंबेगांव, जि. पुणे याच्याशी अनैतिक संबंध होते. दोघेजण काही काळ पती पत्नी सारखे राहत होते. काही दिवसापूर्वी मयत सोनाली ही तीचा प्रियकर सखाराम याला सोडून तीच्या पतीकडे गेली होती. त्यानंतर तीने पून्हा सखाराम याला फोन करुन सांगीतले कि, मला तूझ्याकडे यायचे आहे, मला पैसे दे, मी ज्याच्या सोबत गेले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. तसेच तु मला नाही सांभाळले तर मी तुला सोडणार नाही. तुझ्या विरुध्द गुन्हा दाखल करेल, अशी धमकी देऊ लागली. त्यामुळे सखाराम तीच्या धमकीला वैतागला होता. दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास मयत सोनाली ही तीचा प्रियकर सखाराम याला भेटण्यासाठी पुणे येथुन नगर येथे आली. नगर बस स्थानकावर दोघांची भेट झाली. त्यानंतर सखाराम हा सोनाली हिला घेऊन राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव मंदीरा शेजारच्या डोंगराजवळ आला. सायंकाळी ७.३० वाजे दरम्यान त्या दोघांनी तेथे बसून गप्पा मारल्या. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. आणि सखाराम याने सोनाली हिला लाकडी दांडा व दगडाने मारहाण केली. त्यानंतर त्याने कोयत्याने सोनालीवर वार करून तीचे शिर धडापासुन वेगळे करून तीची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर आरोपी सखाराम हा स्वतः वांबोरी येथील पोलिस चौकीत हजर झाला आणि गुन्हा केल्याची कबूली दिली.
आरोपीचे मृत महिला हिचा पती सात वर्ष जेलमध्ये असताना प्रेम संबंध जुळले व ते पती-पत्नी म्हणून राहू लागले. परंतु पिडीतेचा पती मागील वर्षी जेलमधून बाहेर आल्यानंतर सुमारे तीन महिन्यांपासून ती पतीसोबत शिक्रापूर येथे राहावयास गेली व आरोपीस पैशाची मागणी करून वारंवार ब्लॅकमेल करू लागली. या कारणाने आरोपीने पैसे देण्याच्या बहाण्याने तिला वांबोरी येथे आणून क्रूरपणे खून केला.
पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि मयत सोनाली राजू जाधव हिचे धड व धडापासुन वेगळे झालेले शिर ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. राहुरी पोलिस पथकाने आरोपीला गजाआड करण्यात आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संशयित आरोपी वालकोळी याचे महिलेशी प्रेमसंबंध होते. प्रियसीच्या जाचाला कंटाळून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.फॉरेन्सिक पथकातील तज्ञ राशिद शेख व एमडी जाधव यांचे पथकाने घटनास्थळावरील तपासणी केली.पुढील तपास राहुरी पोलीस करत आहे.
COMMENTS