चिपळूण ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळतांना दिसून येत आहे. अनेक राज्यात उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा जोर असे वातावरण

चिपळूण ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळतांना दिसून येत आहे. अनेक राज्यात उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा जोर असे वातावरण सध्या दिसून येत असतांना चिपळूण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याचे समोर आले आहे.
चिपळूणमध्ये रविवारी ढगफुटीसारखा पाऊस झाला. अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसामुळे परिसरातल्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. अडरे आणि अनारी या गावांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. वास्तविक हवामान विभागांने आधीच राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तासात प्रमाणाबाहेर पाऊस झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली.राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून वादळ वारांसह जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र चिपळूणमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अचानक झालेल्या पावसामुळे या परिसरातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागला. या पावसामध्ये कोणतेही नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
COMMENTS