पाटणा ः बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात अवघ्या 800 रुपयांच्या थकबाकीसाठी एका मजुराची हत्या करण्यात आली. झंझारपूरच्या बेलाराही भागात ही घटना घडली. मायक

पाटणा ः बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात अवघ्या 800 रुपयांच्या थकबाकीसाठी एका मजुराची हत्या करण्यात आली. झंझारपूरच्या बेलाराही भागात ही घटना घडली. मायक्रोफायनान्स कंपनीच्या मॅनेजरने मजूर झोताई मंडल (वय, 51) यांना तीन मजली इमारतीच्या छतावरून खाली फेकल्याचा आरोप आहे. यात मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. झोताईंनी मॅनेजरकडे त्याच्या मेहनतीसाठी आणि हक्कासाठी 800 रुपयांची मागणी केली होती. यामुळे संतापलेल्या मॅनेजरने छतावरून फेकून त्याची हत्या केली. हत्येनंतर झंझारपूर रुग्णालयात प्रचंड गर्दी जमली आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हाणी, अशीही मागणी केली जात आहे.
COMMENTS