Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयभिम महोत्सवात थिरकणार नृत्य पावले !

उपक्रम : नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

बीड प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाने अवघ्या राज्याला एक आदर्श घालून दिला आहे. त्या अनुषंगाने येत्या रविवार (दि.9 ) एप्र

अवैध गांजा विक्री प्रकरणी महिलेस अटक; 61 हजार 500 रुपयांचा गांजा जप्त
लोहा शहरात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी
रॉयल हॉर्स शो च्या माध्यमातून कोल्हापूरात घोड्यांच्या चित्तथरारक कसरती

बीड प्रतिनिधी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाने अवघ्या राज्याला एक आदर्श घालून दिला आहे. त्या अनुषंगाने येत्या रविवार (दि.9 ) एप्रिल रोजी खुली नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदरील स्पर्धा बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने केले आहे.
बीडच्या जयभिम महोत्सवात दरवर्षी विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे राज्यात एक आगळावेगळा महोत्सव म्हणून बीडचा जयभीम महोत्सव अधोरेखित झाला आहे. त्या अनुषंगाने यंदाही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खुली नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून नवोदितांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी यश सवाई 8999109010,मनोज वाघमारे 9923974346, राम प्रधान 919075574573, यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने केले आहे

COMMENTS