Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा थरार

दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी

पुणे ः पुण्यातील हिट अ‍ॅण्ड रनच्या घटना अजूनही काही थांबण्याची चिन्हे नाहीत. कारण पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. एका भरधाव कारचा

आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले
राजधानीत हिट अ‍ॅण्ड रनच्या घटनेत एकाचा मृत्यू
वरळी, बीडमध्ये ‘हिट अँड रन’च्या घटना

पुणे ः पुण्यातील हिट अ‍ॅण्ड रनच्या घटना अजूनही काही थांबण्याची चिन्हे नाहीत. कारण पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. एका भरधाव कारचालकाने एका दुचाकीस्वाराला फरफटत नेले आहे. पुण्यातील पिंपळे गुरव पोलिस चौकीसमोरच हा अपघात घडला आहे. या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. 7 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दोन दिवसानंतर या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच अपघातग्रस्त कार आणि कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव मेन बस स्टॉप परिसरात ही हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारास फरफटत नेले आहे. जेव्हा कारचालक दुचाकीसह चालकाला फरफटत नेत होता तेव्हा आजुबाजूचे लोक कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. चारचाकीचा चालक हा मद्यधुंद असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS