Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी सहा आरोपीस तीन वर्षे कारावास

अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल

अंबाजोगाई प्रतिनिधी - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी सहा आरोपीस दोषी ठरवत तीन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा येथील सत्र न्

नवीन संसद आत्मनिर्भरतेची साक्ष बनेल – पंतप्रधान मोदी
सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत विवाहितेच्या वडिलांचा मृत्यू | LOKNews24
अशी वक्तव्य लोकं ऐकतात, हसतात आणि सोडून देतात

अंबाजोगाई प्रतिनिधी – अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी सहा आरोपीस दोषी ठरवत तीन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा येथील सत्र न्यायाधीश डी. डी. खोचे यांनी शुक्रवारी ठोठावली.
 प्रितम उर्फ पेरीयार रोहीदास बनसोडे, दत्ता रामभाउ त्रुप, संतोष बाबुराव इंदर, लक्ष्मण सोपानराव फाकटे, रामेश्वर साहेबराव गरड,  गणेश शिवलींगअप्पा लासे रा. परळी ही आरोपींची नावे आहेत.
 परळी येथील संभाजीनगर परिसरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीच्या घरावर दगडफेक करून तिच्या घरात घुसून सहा जणांनी तिचा विनयभंग केला. व मुलीसह तिचा बचाव करण्यास आलेल्या साक्षीदारांना जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून सहा जणांविरुद्ध परळी पोलीस ठाण्यात कलम 354, 354 (अ) (ड), 452, 336, 143, 149, 323, 504, 506, 188 भा. द. वी सहकलम 8.12 पोस्को सहकलम 51 (ब) आपत्ती व्यवस्थापन अधि सहकलम 17. म.पो. कायदा सहकलम 11 कोव्हीड विनीयमन 2019 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. आरोपींना अटक करण्यात आली.पोलीस तपासा नंतर आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.हे प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाई येथील सत्र न्यायाधीश डी. डी. खोचे यांच्या न्यायालया समोर सुनावणीसाठी आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिल अ‍ॅड. शिवाजी  मुंडे यांचा युक्तीवाद ग्राहय धरून  न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत  तीन वर्षे शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावला. या प्रकरणात  अ‍ॅड. अशोक  कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कोर्ट पैरवी म्हणून .पो.ना. बी. एस. सोडगीर व म. पो. हे. राहुल शेप यांनी सहकार्य केले.

COMMENTS