उत्तरकाशी ः उत्तरकाशीतील गंगोत्री महामार्गावर बस कठडे तोडून 60 फूट खोल दरीत कोसळली. बस दरीत झाडाला अडकली. या अपघातात तीन महिला भाविकांचा मृत्यू झ

उत्तरकाशी ः उत्तरकाशीतील गंगोत्री महामार्गावर बस कठडे तोडून 60 फूट खोल दरीत कोसळली. बस दरीत झाडाला अडकली. या अपघातात तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला. तर 26 जण जखमी झाले आहेत. बसमध्ये 29 भाविक होते. मृत महिला हल्द्वानी, उधम सिंह नगर आणि नैनिताल येथील रहिवासी आहेत. जखमींमध्ये बरेली, यूपी येथील 5, बुलंदशहर आणि मेरठमधील प्रत्येकी 1 भाविक आहे. उर्वरित सर्व जखमी उत्तराखंडमधील आहेत. स्थानिक पोलीस, एसडीआरएफ, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन आणि वन विभागाच्या पथकाने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.
COMMENTS