पुणतांबा ः ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत होत असून सरपंच पदासाठी पाच उमेदवार तर 17 जागांसाठी अपक्षांचा 56 उमेदवार आपले नशीब आजमावत आहे ग
पुणतांबा ः ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत होत असून सरपंच पदासाठी पाच उमेदवार तर 17 जागांसाठी अपक्षांचा 56 उमेदवार आपले नशीब आजमावत आहे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असून या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल मोठ्या प्रमाणावर झाले होते सरपंच पद महिला राखीव असून या निवडणुकीत 100 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या दिवशी तेहतीस जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. सरपंच पदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. सरपंच पदासाठी पाच उमेदवार रिंगणात असून, अर्ज माघारीच्या दिवशी काहींना उमेदवारी नाकारल्यामुळे पॅनल प्रमुख व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडा जंगी झाली होती, याची सर्वत्र चर्चा असून दोन गटात उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जनसेवा मंडळ आमदार आशुतोष काळे यांचे लोकसेवा मंडळ तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे विकास आघाडी निवडणूक रिंगणात असून काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. पुणतांबा ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची होणार यात शंका नाही. गेल्या अनेक दिवसापासून ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पॅनल प्रमुखांनी तयारी केली होती. काहींनी निवडणूक लढणार असे घोषित केले होते मात्र उमेदवार न मिळाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. काही ठिकाणी वार्ड रचना बदलल्यामुळे आरक्षण पडले त्यामुळे काहींचा हिरमोड झाला. ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने सरपंच पदासाठी उमेदवार उभा करण्यात आला असून दोन अपक्ष देखील आपले नशीब आजमावत आहे.
COMMENTS