Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड तालुक्यातील तीन रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण

पाच वर्षे रखडलेले रस्ते उपअभियंता शशिकांत सुतार यांच्यामुळे पूर्णत्वास

जामखेड ः प्रशासनातील काही आधिकारी खरोखर जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठीच काम करतांना दिसतात. त्यांचे कौशल्य आणि करण्याची पद्धत लोकोपयोगी ठरते. शशिकांत स

ऐफाज व तैमुर ने धरले रमजानचा उपवास
श्रीगोंद्यात 832 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे भिंगार व नगर युवकांच्या कार्याचा अहवाल केला सादर

जामखेड ः प्रशासनातील काही आधिकारी खरोखर जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठीच काम करतांना दिसतात. त्यांचे कौशल्य आणि करण्याची पद्धत लोकोपयोगी ठरते. शशिकांत सुतार जामखेडला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता म्हणून रूजू झाल्यावर तालुक्यातील ठेकेदाराच्या मनमानीमुळे पाच वर्षे रखडलेल्या रस्त्यांचा आढाव घेतला. त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि पावसाळ्यापूर्वी तीनही रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले.

2019 मध्ये कार्यारंभ आदेश दिलेली कामे संबंधित ठेकेदाराने अर्धवट ठेवल्याने वाहनांना नागरिकांना मोठ्या त्रास सहन करावा लागत होता. जनतेचा एकुण त्रास लक्षात घेऊन  उपअभियंता शशिकांत सुतार यांनी कामाचा पाठपुरावा करून ठेकेदाराला नोटीसा बजावल्या. नोटीसांना ठेकेदाराचा प्रतिसाद न मिळाल्याने संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजनबद्ध पाठपुरावा केला. 2018-19 च्या अर्थसंकल्पीय मंजूर करण्यात आलेल्या तिन्ही रस्त्यांच्या कामास 20 सप्टेंबर 2019 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. नगरच्या आरआर कपूर या ठेकेदारास हे काम मिळाले होते. या तिन्ही रस्त्याचे ’बीबीएम’ पर्यंतचे काम करून, उर्वरित काम मात्र ठेकेदाराच्या अनास्थेमुळे रखडले होते. या संदर्भात उपअभियंता सुतार व शाखा अभियंता चांगदेव बांगर यांनी अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. संबंधित ठेकेदारावर तीन ’क’ची कडक कारवाई करून, काम मूळ ठेकेदाराकडून काढून घेण्यात येऊन, नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. दोन महिन्यापूर्वी मार्च 2024 मध्ये नवीन ठेकेदाराला कार्यारंभ आदेश मिळाला. उप अभियंता शशिकांत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड-करमाळा राज्यमार्ग 56 अंतर्गत जवळा ते सोलापूर जिल्हा हद्द, नान्नज-सोनेगाव प्रमुख जिल्हा मार्ग 69. राजूरी आपटी प्रमुख जिल्हा मार्ग तसेच आपटी ते पिंपळगाव उंडा या तीन रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यात आले. सर्व स्तरातील नागरिकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.

ठेकेदाराच्या अनास्थेमुळे गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यातील तीन कामे रखडली होते. संबंधित ठेकेदाराकडे वारंवार पाठपुरावा करूनही कामे प्रलंबित ठेवल्याने, निविदा शर्तीप्रमाणे ठेकेदारावर कारवाई करून, काम काढून घेण्यात आले. नव्याने निविदा प्रक्रिया राबवून, काम पूर्ण करण्यात आले. शशिकांत सुतार, उपअभियंता, बांधकाम उपविभाग, जामखेड

COMMENTS